Video | ‘हात जोडून विनंती करते, वाचवा त्या मुलीला..वाचवा!’ चित्रा वाघ यांची हात जोडून नेमकी कुणासाठी विनंती?

Pune Crime : डेक्कन परिसरातील हॉटेलमध्ये फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न एका तरुणीने केला असल्याची माहिती शनिवारी उघडकीस आली होती. यावेळी तरुणीने फेसबुक पोस्ट करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Video | 'हात जोडून विनंती करते, वाचवा त्या मुलीला..वाचवा!' चित्रा वाघ यांची हात जोडून नेमकी कुणासाठी विनंती?
Chitra WaghImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:04 AM

पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ (Twitter Video) पोस्ट करत शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर हल्लाबोल केलाय. रघुनाथ कुचिक यांच्यावर पुन्हा सनसनाटी आरोप करत हल्ललाबोल केलाय. एका मुलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी फेसबुक पोस्ट लिहिली असून त्याला कुचिक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुलीबाबत आपण गृहमंत्र्यांसह पोलिसांनाही कळवलं. मात्र एकानंही याची दखल घेतली नसल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. कुचिक पीडित मुलीवर दबाव आणत आहे, असा आरोप चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलाय. या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर त्याला पोलिस आणि राज्य सरकार जबाबदार असेल, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. अत्यंत व्यथित होऊन मी हा व्हिडीओ करतेय, असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भावनिक साद घातली आहे. कुचिक यांनी एका मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर जबरदस्ती तिचा गर्भपात केला. या सगळ्याबाबत पुरावे असतानाही त्यांना जामीन कसा मिळतो, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

चित्रा वाघ यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, की

अतिशय व्यथित होऊन मी हा व्हिडीओ करतेय. राज्यमंत्री दर्जा त्याला दिलाय. एका मुलीवर त्यांनी बलात्कार केला. नंतर जबरदस्ती तिचा गर्भपात केला. या मुलीनं समोर येऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एवढ्या गोष्टी पुरावे असतानाही त्यांन जामीन कसा मिळतो, हे मला माहीत नाही. दोनदा त्यांना जामीन मिळालाय. कुचिक त्या मुलीवर दबाव आणत आहेत. केस मागे घेण्यासाठी तिला मेसेज करतोय. या कुचिक यांच्या मागे त्यांचा करता करविता आणि बोलविता धनी कोण आहे? …आणि म्हणून या पीडिती मुलीनं फेसबुकवर पोस्ट टाकून मी स्वतःला संपवेत, असं लिहिलंय.

या मुलीनं जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं आणि त्यात ही मुलगी मेली तर त्याची सगळी जबाबदारी कुचिकसोबत पुणे पोलीस आणि राज्य सरकारचीही असेल. तिने केलेल्या सगळ्या पोस्ट मी पुणे पोलिसांना, गृहमंत्र्यांनी, सीपींना पाठवल्यात. कित्येक फोन मी त्यांना केलेत. मेसेज केलेत. पण एकानंही फोन उचलला नाही. मेसेज पाहून उत्तर दिलेलं नाही. मला कळकळून सांगायचं की वाचवा तिला. हात जोडून मी विनंती करतेय. झोपलेत का सगळे…?

पाहा व्हिडीओ :

काय आहे नेमकं प्रकरण?

शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी तरुणीला विवाहाचे आमीष दाखवलं. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच पीडित तरुण गरोदर राहिली. पीडित तरुणीनं जेव्हा आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा कुचिक यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले, असा आरोप करण्यात आलाय. इतकंच नव्हे गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगावे लागेत, असा इशाराही दिला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

फेसबुक पोस्ट करत आत्महत्येचा प्रयत्न

डेक्कन परिसरातील हॉटेलमध्ये फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न एका तरुणीने केला असल्याची माहिती शनिवारी उघडकीस आली होती. यावेळी तरुणीने फेसबुक पोस्ट करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी पीडित 24 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील(Modal colony) प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत पोलिसात तक्रार करत कारवाईची मागणी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

कल्याण डोंबिवलीत 24 तासात चार ठिकाणी आगीचा भडका, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

परभणीत बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात, 3 जण जागीच ठार

दारूच्या नशेत पठ्ठ्याने असं काही केलं की नागरिकांसह पोलीसही चक्रावले! वसईत नेमकं काय घडलं?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.