Chakan Murder : दोघांवर कोयत्याने सपासप वार! 1 ठार, 1 जखमी, भर रस्त्यात थरार
मध्यरात्री चाकण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडली थरारक घटना! नेमका काय घडलं? वाचा सविस्तर
चाकण : चाकण शहारात थरारक घटना घडली. चाकण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका टोळक्याने दोघा तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा जीव (Chakan Murder) गेला. तर एक तरुण गंभीररीत्या जखमी झालाय. या थरारक घटनेनंतर आता पोलिसांनी तब्बल 12 जणांवर गुन्हा नोंदवलाय. प्राणघातक हल्ला (Chakan Crime News) केल्याप्रकरणी आणि हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकऱणी अधिक तपास केला (Pune crime News) जातोय.
चाकण शहरात रात्री 10 ते 12 जणांच्या गटाने धारदार शस्त्राने दोघा तरुणांवर हल्ला चढवा. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला असावा, असं सांगितलं जातंय. या हल्ल्यादरम्यान, कोयत्याने दोघा तरुणांवर सपासप वार करण्यात आले.
हा हल्ला इतका जबर होता की, एका तरुणाचा या हल्ल्यात जीव गेला. या हत्यात ठार झालेल्या तरुणाचं नाव मोन्या उर्फ मोगेश घोगरे असं आहे. तर अमोल नाटुकर हा तरुण गंभीररीत्या हल्ल्यात जखमी झाला. सध्या अमोल नाटुकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चाकण शहरात घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न तत्काळ पोलिसांकडून करण्यात आला.
चाकण पोलिसांनी एकूण 12 जणांवर या हल्लाप्रकरणी आणि हत्याप्रकरणी गुन्हा नोंदवलाय. चाकण पोलिसांकडून या घटनेचा आता अधिक तपास केला जातोय. या प्रकारामुळे चाकण शहरात खळबळ माजलीय.
चाकणमध्ये वाढत्या गुन्हेगारीचा आळा घालण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. वाढत्या हत्येच्या घटनांनी चाकण शहरातील पोलिसांची चिंता वाढवलीय. नुकताच चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरात एका तरुणाने विवाहितेचा खून केल्याचा प्रकारही समोर आला होता. या हत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटकही केली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री घडलेल्या प्रकाराने चाकणमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.