VIDEO : महिलांच्या दोन गटांमध्ये तुफान वाद, पुरुषही एकमेकांना भिडले, नंतर थेट पोलीस स्टेशनबाहेर कोयते नाचवले

पोलीस स्टेशनबाहेर दोन गट तक्रारीसाठी आले होते. मात्र, तिथेच त्यांच्यात बाचाबाची झाली (clash between two groups at Topkhana police station Ahmednagar).

VIDEO : महिलांच्या दोन गटांमध्ये तुफान वाद, पुरुषही एकमेकांना भिडले, नंतर थेट पोलीस स्टेशनबाहेर कोयते नाचवले
महिलांच्या दोन गटांमध्ये तुफान वाद, पुरुषही एकमेकांना भिडले, नंतर थेट पोलीस स्टेशनबाहेर कोयते नाचवले
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 10:14 PM

अहमदनगर : तोफखाना पोलीस स्टेशन आवारात शुक्रवारी (18 जून) दुपारी मोठा गदारोळ बघायला मिळाला. पोलीस स्टेशनबाहेर दोन गट तक्रारीसाठी आले होते. मात्र, तिथेच त्यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाची, शिविगाळचं रुपांतर थेट हाणामारीत झालं. विशेष म्हणजे या हाणामारीत थेट कोयते नाचवले गेले. पोलिसांसमोर चाकू आणि कोयते बाहेर काढून मोठा गदारोळ माजवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी वेळ न दडवता तातडीने दोन्ही गटाच्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे काहींनी माघार घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत दोन्ही गटातील माणसं जखमी झाले आहेत. मात्र, ही घटना का घडली? असा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींना पडत होता. याच बाबतची सविस्तर माहिती आता समोर आली आहे (clash between two groups at Topkhana police station Ahmednagar).

हाणामारी मागील नेमकं कारण काय?

अहमदनगर शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागात महिलांच्या दोन गटात दुपारी मोठं भांडण झालं. याच भांडणावरुन दोन गटात तिथेच हाणामारी, बाचाबाची सुरु झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी पोलीस पथकाला त्या भागात पाठविले. मात्र, तोपर्यंत हे दोन्ही गट फिर्याद देण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात यायला निघाले होते (clash between two groups at Topkhana police station Ahmednagar).

पोलीस स्टेशनबाहेर पुन्हा राडा

दोघी गटाचे माणसं एकाचवेळी पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले. त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर एकमेकांना बघितल्यानंतर पुन्हा वाद उफाळला. हा वाद इतका भीषण होता की त्यामध्ये धारधार शस्त्रांचा वापर करण्यात आला. पोलीस स्टेशनबाहेर धारधार शस्त्रांचा वापर करुन हाणामारी पाहून तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनाही धक्का बसला. पण पोलिसांनी वेळीच धाव घेतली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शैलेश गोमसाळे आणि वैशाली भामरे धावतच जमावात शिरले. त्यांनी या दोन्ही गटांना बाजूला काढले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टाळला.

हाणामारीत काही जण जखमी

या हाणामारीत गणेश कुऱ्हाडे नावाच्या व्यक्तीने सचिन निकम नावाचा दुसऱ्या गटाचा व्यक्ती आणि त्याचा मित्र गणेश पाटोळे याच्यावर चाकू हल्ला केला. यामध्ये सचिन निकम याच्या डोक्याला मार लागला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. तसेच पोलीस ठाणे परिसरातील एका गाडीचं देखील नुकसान झालं. या हाणामारीच्या वेळी एका गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.

पोलिसांकडून कठोर कारवाई, पाच जणांना अटक, गुन्हा दाखल

पोलिसांनी दोन्ही गटाच्या पाच जणांना अटक केली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलीस स्टेशनबाहेर नेमकं काय घडलं, याची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी मागणे, तसेच धारदार हत्यारे बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हाणामारीचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : आधी मायलेक, आता पतीचाही मृतदेह, काय घडलं ‘त्या’ रात्री? गूढ आणखी वाढलं

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.