पुण्यात लाचखोर उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात, तब्बल 10 लाख रुपयांची मागितली होती लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यात मध्यरात्री मोठी कारवाई केली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.

पुण्यात लाचखोर उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात, तब्बल 10 लाख रुपयांची मागितली होती लाच
शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 7:06 PM

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यात मध्यरात्री मोठी कारवाई केली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. अचानकपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) असे पकडण्यात आलेल्या उपायुक्ताचे नाव आहे.

तक्रारदाराच्या पत्नीकडे 8 लाख रुपयांची लाच मागितली

मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपायुक्त आहेत. तसेच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्यदेखील आहेत. दरम्यान तक्रारदाराने त्याच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी नितीन ढगे यांनी तक्रारदाराकडे  8 लाख रुपयांची लाच मागितली.

उपायुक्ताला रंगेहाथ पकडले

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीनुसार एसीबीने सापळा रचला. नंतर नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलं. सध्या उपायुक्त एसीबीच्या ताब्यात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

गोंदियामध्ये स्वीय सहाय्यक एसीबीच्या कचाट्यात

दुसरीकडे 14 ऑक्टोबर रोजी गोंदिया येथे एका सरकारी अधिकाऱ्याला 10 हजार रुपये लच घेताना अटक करण्यात आलं. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचा अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक आणि दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश मेनन यांना 10 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचलुचपत विभागाची आजपर्यंतची ही पहिलीच घटना होती. तक्रारदाराचे हार्डवेअर आणि भांडे विक्रीचे दुकान आहे. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर वडिलांच्या नावे असलेल्या किरकोळ फटाका विक्री दुकान परवान्याचे नूतनीकरण आणि हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला होता. परंतु राजेश मेनन यांनी यासाठी 10 हजारांची मागणी केली होती. त्यांना लाच घेताना पकडण्यात आले होते.

इतर बातम्या :

Satara District Bank Election | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 21 नोव्हेंबरला मतदान

इचलकरंजीत हॉटेल व्यावसायिकाची तलवारीने हत्या, संतप्त जमावाकडून संशयित आरोपींच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ, मोठा गदारोळ

दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी कर्णपुऱ्यातील बालाजी मंदिरात जबरी चोरी, तीन दानपेट्या लंपास

(Deputy Commissioner Nitin Dhage caught red handed by NCB while accepting bribe in pune)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....