पुणे- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी(D.S. Kulkarni) यांनी ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या ते अटकेत आहेत. पुर्ण नसलेल्या बांधकामांसाठी टाटा फायनान्स , पंजाब नँशनल बँक, एच डी एफ सी बँकांकडून गृहकर्ज(home loan) घेतली मात्र अनेक प्रकल्प सध्या बंद पडलेले आहेत . ग्राहकांना पैसे भरूनही घरं मिळाली नाहीत मात्र काढलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी बँकाकडून ग्राहकांना तगादा लावला जातोय. मात्र घरं मिळाली नाहीत 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज काढल्यामुळे सीबील स्कोअर खराब झालाय.नवीन कर्ज काढता येत नाही मात्र बोगस कर्जांचे फक्ते भरावे लागतायेत . हे कर्ज माफ व्हावं यासाठी पुण्यातील टाटा फायनान्स (Tata Finance)कंपनीच्या बाहेर पीडित ग्राहकांनी आंदोलन केलं.
पुणे , मुंबई, पुणे ग्रामीण भागात प्रकल्पात फ्लॅट ट बुक केलेल्या ग्राहकांनी आंदोलन करत कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे. डी एस कुलकर्णी यांनी हजारो ग्राहकांची हजोरो कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ते सध्या अटकेत आहेत. डी एस कुलकर्णी यांची जप्त केलेली संपत्ती विकून कर्ज भरलं जावं अशी मागणी यावेळी ग्राहकांकडून करण्यात आली. हातात निषेधाचे फलक फलक घेत कर्ज माफीची मागणी यावेळी करण्यात आली. डी एस कुलकर्णी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत प्रकल्प पुर्ण नसलेल्या ठिकाणी कर्ज घेतलं त्याचा परिणाम हा ग्राहकांना सहन करावा लागतोय त्यामुळे ग्राहकांनी टाटा फायनान्स कंपनीच्या बाहेर आंदोलन केलं.
डी एस कुलकर्णी यांनी बोगस गृहकर्ज काढून फसवणूक केल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. विविध बँकांसोबत हातमिळवणी करत घर बुक केल्यानंतर कर्ज मिळवून दिले. मात्र डीएस कुलकर्णीनी पैसे भरून घरं मिळालं नाही. मात्र कर्जाचे हफ्ते कसे भरणार? असा प्रश्न पीडित ग्राहकांना पडला आहे. याप्रकरणी पुण्यातील टाटा फायनान्स कंपनीच्या बाहेर ग्राहकांनी केलं आंदोलन केलं तसेच कर्जाचे हफ्ते थांबवण्याची केली मागणी आंदोलकांनी केली आहे.