रिअल इस्टेट किंग अविनाश भोसलेंना ईडीचे समन्स, पुण्यातील जमीन प्रकरणात चौकशी

अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसलेंना ईडीचे समन्स, पुण्यातील जमीन प्रकरणात चौकशी
अविनाश भोसले
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 8:54 AM

मुंबई/पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘रिअल इस्टेट किंग’ अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना ईडीने समन्स बजावले आहे. आज (गुरुवार 1 जुलै) रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावले आहे. भोसले अंमलबजावणी संचलनालय कार्यालयात चौकशीला हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (ED summons Pune Real Estate King Avinash Bhosale in Money Laundering Case)

अविनाश भोसलेंच्या मुलाचीही चौकशी

अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यालाही ईडीने समन्स बजावले आहे. अमित भोसलेला उद्या (शुक्रवार 2 जुलै) रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश आहेत. पुण्यातील एका जमिनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे. ही जमीन सरकारी असल्यामुळे याबाबत पुण्यात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हायकोर्टाकडून दिलासा नाही

ईडीने गुन्हा रद्द करावा यासाठी अविनाश भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर हायकोर्टानेही अविनाश भोसले यांना चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई हायकोर्टाकडून कोणतीही सवलत न मिळाल्याने अविनाश भोसले यांना ईडीच्या चौकशीला समोर जावं लागत आहे.

40 कोटींची मालमत्ता जप्त

अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.

ईडीकडून यापूर्वी दंडात्मक कारवाई

दरम्यान, अविनाश भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करत 1 कोटी 83 लाखांचा दंड केला होता. 2007 मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्युटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी झाली होती. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरु केली आहे. 2017 साली इन्कम टॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते.

मुंबईत 103 कोटींच्या फ्लॅटची खरेदी!

अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी 103 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत.

कोण आहेत अविनाश भोसले?

>> रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.

>> अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

>> कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

>> अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले.

>> त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली.

>> पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला.

>> अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले.

>> त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली.

>> यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली.

संबंधित बातम्या :

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर

अविनाश भोसले कोण आहेत? रिक्षा चालक ते रिअल इस्टेटचे बादशाह, थक्क करणारा प्रवास, वाचा सविस्तर

(ED summons Pune Real Estate King Avinash Bhosale in Money Laundering Case)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.