Rajgad Honey bee Attack : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांचा हल्ला, हल्ल्यानंतर पळापळीत महिला दरीत कोसळली

या हल्ल्यात येथील एका ग्रुपमधल्या सदस्यांची पळापळ झाली. या पळापळीमध्ये रोहिणी सागर वराट ही महिला पाय घसरून 100 फूट खोल दरीत कोसळली. दरीत कोसळल्यामुळे या महिलेच्या डोक्याला हाताला गंभीर दुखापत झाली.

Rajgad Honey bee Attack : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांचा हल्ला, हल्ल्यानंतर पळापळीत महिला दरीत कोसळली
राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांचा हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 10:12 PM

पुणे : पुण्यातील वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशां (Honey Bee)नी हल्ला केला. हल्ल्यानंतर झालेल्या पळापळीत एक महिला 100 खोल दरीत फूट दरी (Valley)त कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. दरीत कोसळल्यानं महिलेच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस, पर्यटक आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने महिलेला बाहेर काढण्यात आलं. रोहिणी सागर वराट (28) असे जखमी महिलेचे नाव आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, महिलेसह मधमाश्या चावल्यानं जखमी झालेल्या पर्यटकांना नसरापूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय. (Four tourists were attacked by honey bees at Rajgad in Pune, one woman collapsed in the valley)

मधमाशांच्या हल्ल्यानंतर पळापळीत महिला दरीत कोसळली

किल्ले राजगडावर मधमाशांच्या हल्ल्यात झालेल्या धावपळीमध्ये पुणे येथील एक 28 वर्षीय महिला दरीत कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नसरापूर येथील सूर्यवंशी हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. शुक्रवारी 22 तारखेला किल्ले राजगडावर यश बापू घागरे (17),अक्षय मधुकर पवार (30), सागर दिनेश वराट (30) आणि रोहिणी सागर वराट (28) हे चौघे जण पर्यटनासाठी गेले होते. हे सर्व भुमकर चौक वाकड पुणे येथील रहिवासी असून राजगडावर मुक्कामी आले होते. शनिवारी 23 रोजी सकाळी संपूर्ण किल्ला पाहत असताना किल्ले राजगडावरील सुवेळा माचीकडून राजसदरकडे येत असताना अचानक याठिकाणी मधमाश्यांनी हल्ला केला.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

या हल्ल्यात येथील एका ग्रुपमधल्या सदस्यांची पळापळ झाली. या पळापळीमध्ये रोहिणी सागर वराट ही महिला पाय घसरून 100 फूट खोल दरीत कोसळली. दरीत कोसळल्यामुळे या महिलेच्या डोक्याला हाताला गंभीर दुखापत झाली. किल्ल्यावर असलेले पर्यटक रोहित जाधव, अभिषेक जंगले, वैभव गोरे आणि रेस्क्यू टीममधील रोहन देवरे, शुभम भोजने यांनी सदर महिलेला दरीतून बाहेर काढत किल्ल्यावरून खाली आणण्यास मदत केली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने या महिलेस व मधमाशा चावलेल्या पर्यटकांना नसरापूर येथील डॉक्टर सूर्यवंशी हॉस्पिटल याठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केले. डॉ.विजय सूर्यवंशी यांनी तत्परता दाखवत या महिलेवर उपचार केले. वेळेत आणल्याने या महिलेचे प्राण वाचल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. (Four tourists were attacked by honey bees at Rajgad in Pune, one woman collapsed in the valley)

इतर बातम्या

Ulhasnagar Fraud : चंद्रावर जमीन घेणाऱ्यानं 770 स्क्वेअर फूट जागा लाटली? उल्हासनगरच्या राम वाधवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा

VIDEO : उल्हासनगरात भरधाव कारचालकाची अनेक गाड्यांना धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.