कोयता गँगनंतर आता वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रिय, सांस्कृतिक शहरात चाललंय काय?

या घटनेत दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या तर दुचाकी गाड्यांच्या पेट्रोलच्या टाक्या फोडल्या.

कोयता गँगनंतर आता वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रिय, सांस्कृतिक शहरात चाललंय काय?
पुण्यात वाहनांची तोडफोडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 10:09 PM

पुणे : सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. टोळ्यांकडून विविध प्रकारे दहशत माजवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आधीच कोयता गँगच्या दहशतीखाली असलेले पुणेकर आता वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीमुळे बेजार झाले आहेत. गेल्या दहा दिवसात दुसऱ्यांदा वाहनांची तोडफोड केल्याची घटना पुण्यात घडली आहे. गोखले नगर भागात टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली आहे.

रविवारी मध्यरात्री टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

रविवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याचे उघडकीस आले आहे. हातात शस्त्रे पाहून नागरिकही भीतीने घराबाहेर पडले नाही. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात शस्त्र घेऊन तोडफोड केली.

तोडफोडीत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

या घटनेत दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या तर दुचाकी गाड्यांच्या पेट्रोलच्या टाक्या फोडल्या. पुण्यात रात्री मध्यरात्री काही तरूण टोळकी तोंडाला मास्क लावून हातात दगड, दांडकी घेऊन गाड्यांची तोडफोड करत आहेत.

हे सुद्धा वाचा

लोणावळ्यात पर्यटकांशी हुज्जत घालत वाहनांची तोडफोड

याआधी लोणावळ्यात थर्टी फर्स्टच्या पार्टीच्या दिवशी पार्किंगच्या वादातून पर्यटकांना गंभीर मारहाण करत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. रोहन गायकवाड आणि इम्मू शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दुकानासमोर गाडी लावण्यावरुन झालेल्या वादाचे मारामारीत रुपांतर झाले. आरोपींनी पर्यटक निरजकुमार आणि त्याचे मित्र हर्ष यांना गंभीर मारहाण करत वाहनांची तोडफोड केली. यानंतर आरोपी फरार झाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.