मुंबई : कोल्हापूर सत्र (Kolhapur session court) न्यायालयाकडून वकील गुणरत्न सदावर्ते (Ad Gunratna Sadavarte) यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुणे पोलीस (Pune Police) गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सज्ज झालेत. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राज्यभर गुन्हे दाखल झालेत. सगळ्यात त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांची रवानगी साताऱ्यात करण्यात आली. साताऱ्याहून नंतर त्यांना कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर जामीन मिळाल्यावर पुन्हा मुंबई आर्थर रोड जेलमध्ये सदावर्ते यांना आणण्यात आलं. आता सदावर्ते यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं जाण्याची शक्यता आहे. याची कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर पुणे पोलीस सदावर्तेंना ताब्यात घेतली. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसात सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पुणे पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी संपूर्ण तयारी केली.
गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापुरातून सोमवारी रात्री मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर त्यांची रवानगी ही मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधीही आर्थर रोड जेलबाहेर होते. आर्थर रोड जेलमध्ये घेऊन जात असताना विजयी मुद्रा करत सदावर्तेंनी जेलमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी माझा भारतमाता आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं म्हटलंय.
गुणरत्न सदावर्तेंविरोधात दाखल झालेल्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकांतील गुन्ह्यानंतर आता त्यांचा ताबा घेण्यासाठी वेगवेगळ्या पोलीस स्थानकातील पोलिसांची जणू रांगच लागली आहे. सगळ्यात आधी मुंबई त्यानंतर सातारा, त्यानंतर कोल्हापूर त्यानंतर आता पुणे व्हाया मुंबई असा प्रवास गुणरत्न सदावर्ते यांना करावा लागतोय.
दरम्यान, सोशल मीडियामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची चर्चा रंगली आहे. पाहा त्याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट :