कोरेगाव भीमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं नियोजन पूर्ण, नोटिसांपासून बंदोबस्ता पर्यन्त कसं आहे प्लॅनिंग IG सुनील फुलारी यांनी स्पष्टचं सांगितलं
जनतेला कुठलाही त्रास होणार नाही, सोशल मीडियावर देखील आमची करडी नजर आहे, रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अनेक जणांनवर आम्ही कारवाई केली आहे असं सुनील फुलारी यांनी म्हंटलं आहे.
पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत होत असतांना दुसरीकडे कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याशिवाय काही वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे दंगलही झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. त्यामुळे पुणे पोलिसांची मोठी फौज आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त यासाठी लावला जात असतो. कोरेगाव भीमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतिने काही जणांना नोटिसाही बजावल्या जातात. निर्बंधमुक्त महाराष्ट्र असल्याने दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात लोकं बाहेर पडत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. याबाबत कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
सुनील फुलारी म्हणाले, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी आपण मोठा बंदोबस्त ठेवला आहे, सगळ काही शांततेत पार पडेल, लागणाऱ्या सर्व उपाययोजना आम्ही चोख पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
जनतेला कुठलाही त्रास होणार नाही, सोशल मीडियावर देखील आमची करडी नजर आहे, रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अनेक जणांनवर आम्ही कारवाई केली आहे.
पुणे पोलिसांकडून शांततेच्या बैठकी देखिल घेण्यात आल्या आहेत, पुणे ग्रामीण पोलिसांकडून भिमा कोरेगाव येथे 7 पोलीस अधीक्षक 18 पोलीस उपाधिक्षक कार्यरत असणार आहे.
याशिवाय त्यांच्या अंतर्गत 60 पोलीस निरीक्षक, 120 पोलीस उपनिरीक्षक 2500 अंमलदार आणि 4 SRPF च्या तुकड्या तैनात केल्या जाणार आहे.
उद्या सर्वांनी शांततेत येवून अभिवादन करावे अशी विनंती करण्यात आली आहे, सर्व ठिकाणी CCTV बसवण्यात आले आहेत.
ज्या लोकांना मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न याआधी निर्माण झाला होता त्या सर्व लोकांना आम्ही 144 अंतर्गत नोटीस पाठवले आहेत.
त्यासोबतच बाहेरून येणाऱ्या लोकांना देखील अशा नोटीस त्या-त्या पोलीस स्टेशननी पाठवल्या आहेत, पुणे ग्रामीण पोलिसांनी एकुण ७० जणांना नोटीस बजावल्या आहेत.
करणी सेनेच्या ज्या कोणी असे स्टेटमेंट केला आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल कुठलाही अनुचित प्रकार उद्या तिथे घडू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केली आहे.