Indapur : इंदापूर भिशी फसवणूक प्रकरणात अखेर गुन्हा दाखल, दोघांना ताब्यात घेतले

लिलाव भिशीच्या माध्यमातून इंदापूरमधील शेकडो जणांची आतापर्यंत 200 कोटींहून अधिक आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. भिशी चालक अनधिकृतरित्या ही लिलाव भिशी चालवत होते. हातगाडी, टपरी, पथारी, मोलकरीण, भाजी विक्रेते अशा किरकोळ व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत या भिशीत सहभाग होता.

Indapur : इंदापूर भिशी फसवणूक प्रकरणात अखेर गुन्हा दाखल, दोघांना ताब्यात घेतले
इंदापूर भिशी फसवणूक प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 7:21 PM

इंदापूर : इंदापूर शहरातील भिशी प्रकरणात आज अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाच भिशी चालकांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पाच अधिकारी व इंदापूर पोलीस पोलिसांनी भिशी चालकांच्या घरी छापा टाकला. या छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. (Indapur bhishi fraud case finally filed, Both were taken into custody)

लिलाव भिशीच्या माध्यमातून इंदापूरमधील शेकडो जणांची आतापर्यंत 200 कोटींहून अधिक आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. भिशी चालक अनधिकृतरित्या ही लिलाव भिशी चालवत होते. हातगाडी, टपरी, पथारी, मोलकरीण, भाजी विक्रेते अशा किरकोळ व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत या भिशीत सहभाग होता. छोटी भिशी 5 ते 10 लाखापर्यंत आणि मोठी भिशी 50 लाख ते एक-दोन कोटींपर्यंत भिशीची रक्कम ठरवण्यात आली होती.

लिलाव भिशी नेमकी कशी चालवली जाते?

भिशीतील प्रत्येक सभासदाने ठरवलेली रक्कम ठरल्या दिवशी भिशी चालकाकडे आणून द्यायची असते. नंतर भिशी या रकमेचा लिलाव करतो. ज्याला पैशाची गरज असेल तो हा लिलाव वाढवत जातो. त्यानंतर भिशीचा लिलाव झालेली रक्कम कट करुन बाकीचे सभासदांना दिले जातात. यात राहिलेल्या रकमेच्या सर्वांमध्ये वाटून घेतले जाते. लिलाव भिषी व बिन व्याजी भिशी या दोन पैकी लिलाव बेसीस भिशी अत्यंत जोखिमपूर्ण व लाभदायकही ठरते. त्यामुळे अनेकजण रिस्क स्वीकारून या भिशीत उतरतात.

शेकडो जणांची आर्थिक फसवणूक

दरम्यान, इंदापूर शहराच्या बाजारपेठेतील जवळपास प्रत्येक व्यापारी लिलाव भिशीच्या विळख्यात अडकलेला आहे. एक भिशी चालक किंवा मध्यस्थी हा एका वेळी दहा ते पंधरा पुकार भिशी चालवित असतो. बहुतांश भिशी मध्येच बंद पाडून किंवा बंद पडल्यानंतर असे भिशी चालक अर्ध्यातून भिशी बुडवून फरार झाले आहेत. त्यामुळे यात शेकडो जणांची कोट्यवधीची आर्थिक फसवणूक झाली आहे. (Indapur bhishi fraud case finally filed, Both were taken into custody)

इतर बातम्या

सोलापुरमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या, वडिलांनी खर्चासाठी पैसे न दिल्याने उचलले टोकाचे पाऊल

PHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर? वाचा नेमकं काय घडलं

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.