Karuna Sharma : करुणा शर्मांविरोधात गुन्हा दाखल! घटस्फोट घेण्यासाठी महिलेला धमकावल्याचा आरोप, नेमकं काय प्रकरण?
Karuna Sharma News : धक्कादायक बाब म्हणजे जातीवाचक शिवीगाळ करुणा शर्मा यांनी केल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय.
पुणे : करुणा शर्मा (Karuna Sharma News) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. करुण शर्मा यांच्यासह एका पुरुषावरही एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेनं करुण शर्मांसह एका पुरुषावर सनसनाटी आरोप केले आहेत. कौटुंबीक छळाची तक्रार देण्यासाबोत आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. पुण्याच्या (Pune Crime News) येरवडा पोलीस (Yeravda Police) ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनंतर करुणा शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पीडितेच वय 32 वर्ष आहे. करुणा शर्मा यांच्यासह ज्या पुरुषावरही पीडित महिलेने आरोप केलेत, त्याचं नाव अजय देडे असल्याचं कळतंय.
पीडितीने नेमकं काय म्हटलंय तक्रारीत?
पीडित 32 वर्षीय महिलेनं आपल्या तक्रारीमध्ये करुणा शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेला हॉकीस्टीकचा धाक दाखवू शिविगाळ करुणा शर्मा यांनी केली, असा आरोप करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे जातीवाचक शिवीगाळ करुणा शर्मा यांनी केल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय.
तसंच पीडितेनं तिच्या पतीला घटस्फोट द्यावा, यासाठी करुणा शर्मा यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, असाही आरोप करण्यात आलाय. तर पीडितेचा पती अजय कुमार देडेने आपल्यावर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले आणि मानसिक, शारीरिक त्रास दिला, असा आरोपी पीडित महिलेनं केलाय. मी करुणासोबत लग्न करणार आहे, तू मला घटस्फोट दे, असं म्हणत पीडितेच्या पतीनं तिला माहेर नेऊन सोडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार पीडित महिला ही पतीच्या शोध मुंबईत आली होती. मुंबईतील सांताक्रझ येथील ग्रीन इमारतीत पीडित पिहाल 3 जून रोजी गेली होती, अशीह माहिती मिळतेय.
अडचणी वाढणार?
पीडितेनं केलेल्या तक्रारीनंतर येरवडा पोलिसांनी याप्रकरणी पुन्हा दाखल केलाय. कलम 498 (अ), 377, 323, 504, 506 (2), 34 अन्वये गुन्हा दाखल करुन घेत पोलिसांनी आता पुढील तपास सुरु केलाय. त्याचप्रमाणे अनुसुचित जाती व जमाती अत्याचारास प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(R)(S) अनव्येदेखील येरवडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय. सध्या येरवडा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.