पुणे : पुणे शहरात काल रात्री केलेल्या कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) दरम्यान पुणे पोलिसांच्या हाती जिवंत काडतुसे (Cartridges) लागली आहेत. पर्वती भागातील एका भंगाराच्या व्यापाऱ्याकडून तब्बल 1 हजार 105 गोळ्या जप्त केल्या असून, त्यातील 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे, 970 बुलेट (लीड) असा जवळपास 1 लाख 57 हजारांचे घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी भंगार व्यापाऱ्याला अटक (Arrest) करण्यात आले आहे. दिनेशकुमार कल्लुसिंग सरोज असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. आज त्याला पुणे कोर्टात हजर केलं असता न्यायालयाकडून त्याला 15 जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यापूर्वी पुण्यात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवण्यात आले. दरम्यान ही कारवाई करण्यात आली. गुरुवार पेठेतील गौरी अली येथे एका भंगार विक्रेत्याने त्याच्या दुकानात बंदुकीची काडतुसे ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून एकूण 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे आणि 970 बुलेट शिसे असा एकूण 1.56 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भंगार विक्रेता दिनेश कुमार कल्लुसिंग सरोज (34) याच्या विरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. (Live cartridges and bullets were found during the combing operation in Pune)