लोणावळ्यात चोरट्यांचा धूमाकूळ, एकाच रात्रीत फोडली 3 दुकानं
लोणावळा शहरात सध्या चोरट्यांनी, गुन्हेगारांनी धूमाकूळ घातला असून एकाच रात्रीत त्यांनी १-२ नव्हे तब्बल तीन दुकान फोडून माल लंपास केला. त्यामध्ये काही महत्वाची कागदपत्र आणि लॅपटॉपचाही समावेश असल्याचं समजतं.
लोणावळा | 12 मार्च 2024 : लोणावळा शहरात सध्या चोरट्यांनी, गुन्हेगारांनी धूमाकूळ घातला असून एकाच रात्रीत त्यांनी १-२ नव्हे तब्बल तीन दुकान फोडून माल लंपास केला. त्यामध्ये काही महत्वाची कागदपत्र आणि लॅपटॉपचाही समावेश असल्याचं समजतं. एका दुकानामध्ये चोरी करताना हे सर्व चोर तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटननगरी लोणावळ्यात चोरट्यांनी एकाच रात्री तीन दुकानं फोडली. पहिली चोरी ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे फेडरेशन या खासगी कार्यालयात झाली. तर दुसरी आणि तिसरी चोरी मुख्य बाजारपेठेतील एक दुकान फोडून करण्यात आली. गणेश आर्ट्स हे दुकान फोडण्यात आलं, यावेळी तेथील लोखंडी कपाटातून महत्त्वाची कागदपत्रे गायब करण्यात आली. तसेच त्या दुकानातील एक लॅपटॉपही चोरण्यात आला. एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ही चोरीची घटना कैद झाली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून -सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोणावळा पोलीस या चोरांचा तपास करत आहे.