इलेक्ट्रिक हिटर छातीला कवटाळून आयुष्य संपवलं, विवाहितेच्या आत्महत्येने पुणे हादरलं

विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. धनश्री अजित करडे असे दौंड तालुक्यातील यवतमधील मयत महिलेचे नाव आहे. इलेक्ट्रिक हिटरने शॉक घेत तिने आयुष्य संपवलं.

इलेक्ट्रिक हिटर छातीला कवटाळून आयुष्य संपवलं, विवाहितेच्या आत्महत्येने पुणे हादरलं
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 3:27 PM

दौंड : घरातील विद्युत हिटर आपल्या छातीस कवटाळून विवाहितेने आत्महत्या केली. हिटरचा शॉक लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं?

विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. धनश्री अजित करडे असे दौंड तालुक्यातील यवतमधील मयत महिलेचे नाव आहे. इलेक्ट्रिक हिटरने शॉक घेत तिने आयुष्य संपवलं.

सासरी जाच झाल्याचा आरोप

चारचाकी गाडी घेण्यासाठी महिलेला सासरी त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. हुंड्याची मागणी करुन तिला शिवीगाळ, दमदाटी करुन मानसिक आणि शारीरिक छळ देत होते. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.

सासरच्या चौघांवर गुन्हा

या प्रकरणी यवत पोलीसांनी मयत विवाहित महिलेची सासू, नवरा, दीर आणि नणंद अशा चौघा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीतही महिलेचा राहत्या घरी गळफास

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड मधील सांगवी भागात महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्याच ठिकाणी रक्ताने माखलेली एक डायरीही आढळली होती.

ओढणीने गळफास घेत महिलेची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील सांगवी या भागात एका महिले स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी महिलेने तिच्याच ओढणीचा उपयोग केला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड या भागात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे महिलेने आत्महत्या नेमकी का केली, हे समजू शकलेले नाही.

मृतदेहाशेजारी आढळली रक्ताने माखलेली डायरी 

महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महिलेच्या घराची पाहणी केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत महिलेच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेली एक डायरी आढळून आली आहे. रक्ताने माखलेली डायरी मिळाल्यामुळे महिलेच्या आत्महत्येचं गूढ आणखीनच  वाढलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या डायरीला पंच आणि नातेवाईकांच्या समोर उघडण्यात येणार आहे.

वसईत पतीच्या प्रकृतीच्या धसक्याने पत्नीची आत्महत्या

दरम्यान, सर्व कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यात पतीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे हतबल होऊन वसईत पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. वसईच्या मर्सेस गावात स्मिता डिसिल्वा (वय 35) या विवाहित महिलेने आत्महत्या केली होती.

संबंधित बातम्या :

ओढणीने गळफास लावून आत्महत्या, महिलेच्या मृतदेहाजवळ आढळली रक्ताने माखलेली डायरी, गूढ वाढलं

कोरोनाने पतीचा मृत्यू, विरहातून पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसह आत्महत्या, पुण्याच्या शिक्षक दाम्पत्याचा करुण अंत

पती निधनानंतर 22 वर्षीय पत्नीची आत्महत्या, विरारमध्ये दाम्पत्याचा करुण अंत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.