दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची हत्या, काठीने मारहाण करुन डोक्यात फरशी टाकली

मयत तरुण आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी येथील रहिवासी होता. तरुणाच्या हत्येचे कारण मात्र अद्यापही अस्पष्टच आहे. मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची हत्या, काठीने मारहाण करुन डोक्यात फरशी टाकली
मंचरमध्ये तरुणाची हत्या
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 12:58 PM

पुणे : ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात हत्येची घटना समोर आली आहे. आंबेगावच्या मंचरमध्ये तरुणाचा खून करण्यात आला. रात्रीच्या सुमारास काठीने मारहाण करुन डोक्यात फरशी टाकून तरुणाची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण

पुणे जिल्ह्यातील आंबेगावच्या मंचर घोडेगाव रोडवर रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. काठीने मारहाण करुन डोक्यात फरशी टाकून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. बाळू पारधी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हत्येचं कारण अस्पष्ट

मयत तरुण आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी येथील रहिवासी होता. तरुणाच्या हत्येचे कारण मात्र अद्यापही अस्पष्टच आहे. मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

गर्लफ्रेण्डची आत्महत्या, प्रियकराकडून सूड

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील मोहित तिवारी हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त प्रियकराने त्याच्या मित्रासह मोहित तिवारीचा कुऱ्हाडीने गळा चिरुन खून केला होता. पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कल्लू पासवान आणि त्याचा साथीदार अनिल यादव यांना अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

काय आहे प्रकरण?

11 ऑक्टोबर रोजी सकाळी उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील किशनपूर पोलीस स्टेशन परिसरातील रारी गावाच्या जंगलात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने गळा कापून तरुणाचा खून करण्यात आला होता. मृतदेह त्याच गावातील गोलू उर्फ ​​मोहित तिवारी याचा असल्याचं समोर आलं होतं.

आरोपीच्या मैत्रिणीची आत्महत्या

मुख्य आरोपी कल्लू याने पोलिसांना सांगितले की, तो गावातील एका मुलीवर प्रेम करत होता आणि त्याला पळून जाऊन तिच्याशी लग्न करायचे होते. त्याच वेळी ती मुलगी मोहितच्या संपर्कात आली आणि मोहितने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्यामुळे ती मुलगी माझ्यापासून अंतर राखून राहत होती. मुलीवरुन माझे मोहितशी खटके उडू लागले, तेव्हा ही गोष्ट गावात चर्चेचा विषय झाली. या चर्चांच्या भीतीमुळे मुलीने आत्महत्या केली.

कुऱ्हाडीने गळा कापून खून

कल्लूने सांगितले की, मी मोहितचा मित्र अनिल यादव याला बोलावून सूड भावनेने मोहितची हत्या करण्याचा कट रचला. गावाबाहेर दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावून मोहितची कुऱ्हाडीने गळा कापून त्याचा खून केला. पोलिसांनी खुनामध्ये वापरलेली कुऱ्हाड आणि मृत मोहित तिवारीचा मोबाईलही जप्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ही घटना किशनपूर पोलीस स्टेशन परिसरातील रारी गावातील आहे.

संबंधित बातम्या :

बायकोला छळण्यासाठी नवऱ्याने ‘आत्महत्ये’चा बनावट व्हिडीओ पाठवला, पोलिसांनी बनाव कसा उघड केला?

दोन दिवसांपासून बेपत्ता, शेतातल्या विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह, आत्महत्या की घातपात? पोलिसांपुढे मोठं आव्हान

पाकीट पळवणाऱ्या चोरट्याचा पाठलाग महागात, विरारमध्ये 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.