जामिनास मदतीसाठी पाच लाखांची मागणी, पुण्यात लाच घेताना API रंगेहाथ अटक

सहायक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील (वय 33 वर्ष) आणि खासगी व्यक्ती संतोष भाऊराव खांदवे (वय 45 वर्ष, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्याचं आश्वासन देत त्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे.

जामिनास मदतीसाठी पाच लाखांची मागणी, पुण्यात लाच घेताना API रंगेहाथ अटक
Bribe
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 9:11 AM

पुणे : एक लाच रुपयांची लाच घेताना पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकासह दोघे जण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

सहायक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील (वय 33 वर्ष) आणि खासगी व्यक्ती संतोष भाऊराव खांदवे (वय 45 वर्ष, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्याचं आश्वासन देत त्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. पाच लाखांपैकी एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना दोघे रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीच्या जाळ्यात सापडले.

सांगलीतही पोलीस अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

दुसरीकडे, सांगलीतही 25 हजाराची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय समाधान बिले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केल्याची माहिती आहे. तक्रारदाराला पॉक्सो कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपी करत नाही, असे सांगून त्याच्याकडे पोलीस अधिकाऱ्याने चक्क 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

उस्मानाबादेत आरटीओ कार्यालयातील लाचखोर दलाल

दरम्यान, उस्मानाबादमध्ये लाच घेताना आरटीओ कार्यालयातील दोन दलालांना अटक करण्यात आली. 4500 रुपयांची मागणी करुन पूर्वीचे 1500 आणि आताचे 3 हजार, अशी एकूण 4 हजार 500 रुपयांची लाच घेताना दोघे सापडले. तानाजी भोगील आणि संदीप सूर्यवंशी अशी दोघा खासगी दलालांची नावे आहेत.

उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या. चारचाकी मालवाहू गाडीची पुनर्नोंदणी करण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. उस्मानाबाद उपप्रादेशिक परिवहन कार्यालय दलालांचा अड्डा बनत चालल्याचं समोर येत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत ही दुसऱ्यांदा कारवाई झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे क्लार्क अडकले

याआधी, अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात अडकले होते. डुप्लिकेट रेशनकार्ड आणि ऑनलाईन नोंदणी यासाठी प्रत्येक कार्डामागे पाचशे रुपयांची लाच घेताना या दोन क्लार्कना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ बेड्या ठोकल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती.

संबंधित बातम्या :

अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क एसीबीच्या जाळ्यात, दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ

मैत्रिणीला भेटायला आला आणि अडकला, गँगस्टर सोनू पठाणला अटक, समीर वानखेडेंच्या पथकाची कारवाई

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.