Pune Murder | अंगणात कोंबड्या आल्यावरुन वाद, बारामतीत महिलेची निर्घृण हत्या

मयत महिला आणि आरोपीचे घर समोरासमोर आहे. दोन्ही कुटुंबामध्ये अंगणात कोंबड्या येण्यावरुन आणि पाच फूटांच्या जागेवरुन वारंवार वाद होत होता. रविवारी दुपारी देखील याच कारणामुळे आरोपीच्या बायको सोबत गंगुबाई यांचा वाद झाला होता.

Pune Murder | अंगणात कोंबड्या आल्यावरुन वाद, बारामतीत महिलेची निर्घृण हत्या
बारामतीत क्षुल्लक वादातून महिलेची हत्या
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 10:36 AM

बारामती: अंगणात कोंबड्या आल्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात महिलेला प्राण गमवावे लागले. डोक्यात कुऱ्हाडीने वार करत महिलेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

गंगूबाई तात्याराम मोरे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी किरण मोरे याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आणि आरोपीचे घर समोरासमोर आहे. दोन्ही कुटुंबामध्ये अंगणात कोंबड्या येण्यावरुन आणि पाच फूटांच्या जागेवरुन वारंवार वाद होत होता.

डोक्यावर कुऱ्हाडीने वार

रविवारी दुपारी देखील याच कारणामुळे आरोपीच्या बायको सोबत गंगुबाई यांचा वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात किरण याने गंगूबाईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात गंगुबाई गंभीर जखमी झाल्या.

उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

केरळमध्ये बायकोंची अदलाबदल करणारं मोठं रॅकेट, परपुरुषांशी लैंगिक संबंधांसाठी हजारोंचा पत्नीवर दबाव

गर्लफ्रेण्डचीही ‘गर्लफ्रेण्ड’ निघाली, बॉयफ्रेण्ड चवताळला, समलिंगी संबंधातून 29 वर्षीय तरुणीची हत्या

माझी बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या, नवरा थेट पोलिसात; बायकोने सांगितलं चक्रावणारं कारण

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.