Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

17 वर्षांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार, पुण्यात प्रसिद्ध बिल्डरवर गुन्हा

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भारत देसरडाला यांनी 17 वर्षांपूर्वी आपल्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर ते वारंवार आपल्यावर लैंगिक अत्याचार करत राहिले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

17 वर्षांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार, पुण्यात प्रसिद्ध बिल्डरवर गुन्हा
Privet lender Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 2:49 PM

पुणे : प्रसिद्ध बिल्डरने बलात्कार (Pune Builder) केल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. बिल्डरने आपल्याला 17 वर्षांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यानंतर वारंवार बलात्कार केल्याचा (Rape on Pretext of Marriage) आरोप पीडितेने केला आहे. पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारत देसरडाला असे आरोपी बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध रोहन बिल्डर्सचे देसरडाला भागीदार संचालक आहेत. देसरडाला हे पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते. त्यामुळे देसरडाला यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने साहित्य क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

काय आहेत आरोप?

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भारत देसरडाला यांनी 17 वर्षांपूर्वी आपल्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर ते वारंवार आपल्यावर लैंगिक अत्याचार करत राहिले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत भारत देसरडाला?

भारत देसरडाला हे पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. पुण्यातील सुप्रसिद्ध रोहन बिल्डर्सचे देसरडाला भागीदार संचालक आहेत.

भारत देसरडाला हे पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते. त्यामुळे देसरडाला यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने साहित्य क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या :

सामूहिक बलात्काराच्या घटनेने नागपुरात खळबळ; फेसबूकवरून मैत्री झाली, युवकाने फ्लॅटवर बोलावले आणि…

अमरावतीच्या 31 वर्षीय नर्सशी ऑनलाईन ओळख, लग्नाच्या आमिषाने अत्याचार, पाच महिन्यांनी बिंग फुटलं

अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.