Diamonds Smuggle | शारजा रिटर्न प्रवाशाकडे 48 लाखांचे अमेरिकन हिरे, पुणे विमानतळावर अटक

17 मार्च रोजी शारजाहून येणाऱ्या एका विमानात हिऱ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती पुणे कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला मिळाली होती. त्यानुसार पुणे कस्टम विभागाने केलेल्या एका प्रवाशाला अडवत त्याची चौकशी केली

Diamonds Smuggle | शारजा रिटर्न प्रवाशाकडे 48 लाखांचे अमेरिकन हिरे, पुणे विमानतळावर अटक
पुणे विमानतळावर प्रवाशावर कारवाईImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 7:43 AM

पुणे : संयुक्त अरब अमिराती (UAE) हून पुण्याला आलेल्या प्रवाशाकडे तब्बल तीन हजार अमेरिकन हिरे (American Diamonds) सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रवासी शारजाहून पुणे विमानतळावर (Pune Airport) आला होता. 75 कॅरेटच्या या हिऱ्यांची एकूण किंमत 48 लाख 66 हजार रुपये इतकी असल्याची माहिती आहे. कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या (Air Intelligence Unit) अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावर ही कारवाई केली. तीन हजार अमेरिकन हिरे बाळगणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

17 मार्च रोजी शारजाहून येणाऱ्या एका विमानात हिऱ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती पुणे कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला मिळाली होती. त्यानुसार पुणे कस्टम विभागाने केलेल्या एका प्रवाशाला अडवत त्याची चौकशी केली. चौकशी करत असतानाच त्याची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे सुमारे तीन हजार अमेरिकन डायमंड्स सापडले.

48 लाख 66 हजारांचे हिरे

हे हिरे प्रवाशाच्या सामानात पॅक केलेल्या ट्राउझर्सच्या पाऊचमध्ये लपवून ठेवले होते. 75 कॅरेटच्या या हिऱ्यांची एकूण किंमत 48 लाख 66 हजार रुपये इतकी असल्याची माहिती आहे. भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न केलेले हे हिरे सीमा शुल्क कायदा 1962 नुसार जप्त करण्यात आले आहेत. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

विश्वासातील नोकराकडून विश्वासघात, 53 लाखांचे हिरे-दागिने लंपास, 24 तासात नोकराला अटक

इराण ते उरण, समुद्राने 2,000 कोटींच्या हेरॉईनची तस्करी, टॅल्कम पावडरमध्ये लपवला ड्रग्जसाठा

डोंगर पोखरून गारगोटीची तस्करी, थेट चीनपर्यंत विक्री, जालन्यातल्या हिरवट निळ्या दगडांचं महत्त्व आहे तरी काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.