CCTV | उधारी परत करण्याचा तगादा, पुण्यात 34 वर्षीय तरुणाच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

युवराज जाधव याने आरोपी गणेश खरात याला व्याजाने पैसे दिले होते. मात्र खरात युवराजला परत पैसे देत नसल्याने दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये युवराजने खरातला शिवीगाळ केली होती.

CCTV | उधारी परत करण्याचा तगादा, पुण्यात 34 वर्षीय तरुणाच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
पुण्यात हत्येचा थरारImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 9:23 AM

पुणे : व्याजाच्या पैशावरुन झालेल्या वादातून तरुणाची हत्या (Pune Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुऱ्हाडीने वार करुन पुण्यात 34 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला होता. पापडे वस्ती फुरसुंगी येथे रविवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला होता. या घटेनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले आहे. भरवस्तीत खून झाल्याने स्थानिकांमध्ये दहशत पसरली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. उधारी परत करण्याचा तगादा लावल्याने आरोपीने तरुणाचा खून केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

युवराज बबन जाधव (वय 34 वर्ष, रा.पापडेवस्ती, भेकराईनगर फुरसुंगी ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत बबन जाधव (वय 55 वर्ष, रा. पापडेवस्ती, फुरसुंगी ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश सुरेश खरात (वय 30 वर्ष, रा.पापडेवस्ती, फुरसुंगी ) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार, युवराज जाधव याने आरोपी गणेश खरात याला व्याजाने पैसे दिले होते. मात्र खरात युवराजला परत पैसे देत नसल्याने दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये युवराजने खरातला शिवीगाळ केली होती. त्यातूनच रागाच्या भरात खरातने युवराज याला घरासमोर कुऱ्हाडीने सपासप घाव घालून ठार केले. त्यानंतर खरात पसार झाला होता.

आरोपीला अटक

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहून नागरिकांमध्ये भीती पसरली होती. हडपसर पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ससून रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

उत्तर प्रदेशात अवघ्या 500 रुपयांसाठी केली 13 वर्षीय मुलाची हत्या; मित्राने दिली गुन्ह्याची कबुली

प्रेयसीला अडकवण्यासाठी प्रियकराने रचला भयंकर कट, अंबरनाथमधील तरुणाच्या हत्येची उकल

उधारीचे पैसे मागितले म्हणून कुऱ्हाडीनं सपासप वार केले, हडपसरमध्ये सराईतास बेड्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.