Pune VIDEO | जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात राडा, लाठ्याकाठ्या आणि तलवारींनी हाणामारी
जमिनीच्या वादातून रक्त्याच्या नात्यातील व्यक्तीच एकमेकांचे दुश्मन झाल्याचं पाहायला मिळालं. हाणामारीमध्ये दोन्ही कुटुंबांतील सदस्य जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुणे : दोन कुटुंबात तुफान हाणामारी (Fighting) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून चुलत भावंडांमध्ये राडा झाला. पुणे जिल्ह्याच्या (Pune Crime) शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे हा प्रकार घडला. लाठ्याकाठ्या आणि तलवारी हातात घेऊन दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर (Video) आला आहे. जमिनीच्या वादातून भाऊच भावाचा वैरी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. या प्रकरणात दोन्ही गटातील लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आता शिरूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाले असून शिरुर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात तुफान राडा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चुलत भावंडांमध्ये पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे राडा झाला. लाठ्याकाठ्या आणि तलवारी हातात घेऊन दोन कुटुंबं एकमेकांना भिडली.
जमिनीच्या वादातून रक्त्याच्या नात्यातील व्यक्तीच एकमेकांचे दुश्मन झाल्याचं पाहायला मिळालं. हाणामारीमध्ये दोन्ही कुटुंबांतील सदस्य जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हाणामारीची घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही कुटुंबांतील सदस्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिरुर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
Mankhurd CCTV | मुंबईतील मानखुर्दमध्ये दोन गटात राडा, 15 ते 20 गाड्यांची तोडफोड
VIDEO | प्रेमी युगुलाचा रस्त्यात राडा, भांडण सोडवणाऱ्यालाच प्रेयसीची शिवीगाळ, मग भावाची सटकली आणि…
Pune | जातेगाव बुद्रुकमध्ये दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादावरून तुफान हाणामारी