चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने पुण्यात नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, शॉर्ट फिल्म मेकरवर गुन्हा

समीर बाळू निकम असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी समीर हा यूट्यूबवर शॉर्ट फिल्म बनवतो. त्याने यूट्यूबवर काही लघुपट आणि गाणीही बनवली आहेत

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने पुण्यात नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, शॉर्ट फिल्म मेकरवर गुन्हा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 11:58 AM

पुणे : चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी पुण्यात शॉर्ट फिल्म मेकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

समीर बाळू निकम असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी समीर हा यूट्यूबवर शॉर्ट फिल्म बनवतो. त्याने यूट्यूबवर काही लघुपट आणि गाणीही बनवली आहेत. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने त्याने 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सलग दोन वर्षांपासून तो तिच्यावर बलात्कार करत होता. पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूड फोटोवरुन धमकावत बुलडाण्यात बलात्कार

दुसरीकडे, 15 वर्षीय मुलीचे न्यूड फोटो काढून ते व्हायरल करण्याच्या धमकीने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी नराधम आणि त्याला मदत करणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. तिच्याच परिसरात राहणाऱ्या दोन मुलींमार्फत फसवून तिचे न्यूड फोटो काढण्यात आले. ते फोटो व्हायरल करुन तुझ्या आई – बाबांना दाखवेन, अशी धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला.

एवढंच नव्हे तर त्या मुलीला वाटेल तिथे बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलीने तक्रार दिल्यावर आरोपी नराधम आणि त्याला सहकार्य करणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली.

पीडितेची घरी तक्रार

बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातील असलेला आरोपी 30 वर्षीय भूषण गजानन बोरसे या नराधमाच्या धमक्यांना बळी पडून वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी 15 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीच्या अब्रूचे लचके तोडण्याचे कृत्य या नराधमाने केले. वेळोवळी होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने सर्व हकीकत आपल्या घरी सांगितली.

पीडितेच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कलम 376(2) (N), 354 आ (i), 506, 34 आयपीसी सहकलम 4 बा.लै.अ.सं. अधिनियम 2012 नुसार गुन्हा नोंदवला.

संबंधित बातम्या :

Video: चोरट्याला धडा शिकवण्यासाठी तो धावला पण त्रिपाठीनं डाव साधला, वसईतल्या हत्येचा थरार CCTV मध्ये कैद

अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार, पीडिता गरोदर, कोर्टाकडून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.