Pune Murder | चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव, पोलिसांनी पितळ उघडं पाडलं

रमेशला मद्यपानाचे व्यसन होते, मात्र तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. तसंच तो सतत बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. याच कारणावरुन मध्यरात्रीच्या सुमारास नंदिनीने रमेशचा गळा नायलॉनच्या दोरीने आवळून खून केला.

Pune Murder | चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव, पोलिसांनी पितळ उघडं पाडलं
पुण्यात पतीची हत्या करुन आत्महत्येचा बनाव Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 12:38 PM

पुणे : पतीचा मृत्यू ही आत्महत्या (Suicide) असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं पितळ पोलिसांनी उघडं पाडलं. पतीने गळफास घेतल्याचा बनाव विवाहितेने रचला होता, मात्र पत्नीनेच त्याची हत्या (Husband Murder) केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं. पुण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उत्तम नगर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून बायकोने नवऱ्याचा खून केल्याचा आरोप आहे. कामधंदा न करणारा पती सतत दारुसाठी पैसे मागायचा आणि आपल्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, या रागातून महिलेने पतीची हत्या (Pune Crime) केल्याचा दावा केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

रमेश भिसे (वय 44 वर्ष, रा. लांडगे निवास, उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे मयत पतीचे नाव आहे. हत्ये प्रकरणी पत्नी नंदिनी रमेश भिसे (वय 40 वर्ष) हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रमेश आणि त्याची पत्नी नंदिनी भिसे उत्तम नगरमध्ये भाड्यावर खोली घेऊन राहत होते. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. रमेशला मद्यपानाचे व्यसन होते, मात्र तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. तसंच तो सतत बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. याच कारणावरुन मध्यरात्रीच्या सुमारास नंदिनीने रमेशचा गळा नायलॉनच्या दोरीने आवळून खून केला.

आत्महत्येचा बनाव

हत्या केल्यानंतर नंदिनीने पतीच्या गळ्यात दोरी बांधून ती घरातील हुकाला अडकवली. पतीने आत्महत्या केल्याचे तिने मुलगा आणि नातेवाईकांना कळवले.

रमेशचा मृतदेह ससून रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यावेळी त्याचा गळा आवळून खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी नंदिनी, तिचा मुलगा, नातेवाईकांची चौकशी केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर नंदिनीने पतीचा खून केल्याची कबुली दिले.

हत्येची कबुली

नवरा सारखा आपल्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. काहीही कामधंदा न करता सतत दारु पिण्यासाठी पैसे मागायचा, रोजच्या त्रासाला कंटाळून त्याचा खून केल्याचं नंदिनीने पोलिसांना सांगितले. नंदिनीला 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

गळा आवळून बायकोनं नवऱ्याला संपवलं! हत्येआधी पतीला इलेक्ट्रीक पोलला लटकवलं

 अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, आरोपी पत्नीसह प्रियकर अटकेत

पतीच्या मित्रासोबत विवाहबाह्य संबंध, बोभाटा होताच नवऱ्याची हत्या, वर्ध्यात विवाहिता-प्रियकर आणि भाचा अटकेत

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.