अविनाश भोसले यांच्यापुढच्या अडचणी संपेना, दस्त नोंदणीत छेडछाड, जमिनीच्या खोट्या नोंदी, पोलिसांकडून गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, विनोद गोयंका, विकास ओबेरॉय यांच्यासह चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमीन दस्त तसेच नोंदणी कायद्याचं उल्लंघन करुन दिशाभूल केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अविनाश भोसले यांच्यापुढच्या अडचणी संपेना, दस्त नोंदणीत छेडछाड, जमिनीच्या खोट्या नोंदी, पोलिसांकडून गुन्हा दाखल
अविनाश भोसले
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 10:05 AM

पुणे : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, विनोद गोयंका, विकास ओबेरॉय यांच्यासह चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमीन दस्त तसेच नोंदणी कायद्याचं उल्लंघन करुन दिशाभूल केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नेमका आरोप काय?

सहदुय्यम निबंधक एल. एम. संगावार यांनी दिली विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन भारतीय नोंदणी नोंदणी अधिनियम १९०८ कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल केला गेलाय. संगमवाडी येथील चेतन निकम यांच्या जमिनीच्या खोटया नोंदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दस्तामध्ये त्यांची जमीन नमूद न करता ती विक्री करणाऱ्या व्यक्तीची असल्याचे भासविण्यात आलं. काही खरेदी खतातील सर्वेक्षण क्रमांक चुकीचे टाकून मूळ मालकी असलेल्या अरदेसर बमनजी सेठा यांच्या जमिनीची देखील चुकीची नोंद केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दस्त नोंदणीचं उल्लंघन केलयाचं समोर आल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंद

यासगळ्या प्रकरणी चेतन निकम यांनी हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार अर्ज दिले होते. संबंधित तक्रार अर्जाची चौकशी सह जिल्हा निबंधक मुद्रांक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी केली होती. त्यामध्ये उल्लंघन केल्याचे आढळून आलं होतं.

उल्लंघन केल्याचं समोर आल्यानंतरच पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींनी जमीनीचे खरेदीखत दस्त, करारनामा या कागदपत्रांमध्ये फेरफार केला तसेच भारतीय नोंदणी अधिनियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याचे सहदुय्यम निबंधक संगावार यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

ईडीचा दणका, अविनाश भोसले यांची पुण्यातील 4 कोटींची संपत्ती जप्त

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची तब्बल 4 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केली आहे. पुण्यातील ABIL अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा ईडीने जप्त केली आहे. या जमिनीची किंमत चार कोटी रुपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासूनपुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित हे ईडीच्या रडारवर आहेत. गेल्याच महिन्यात त्यांची 5 तास चौकशी केली होती. मनी लाँडरिंग प्रकरणात दोघांना ईडीने समन्स पाठवलं होतं. पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे, जी जमीन सरकारी होती. या जमिनीबाबत पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीनेदेखील गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.

40 कोटींची मालमत्ता जप्त

अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.

मुंबईत 103 कोटींच्या फ्लॅटची खरेदी!

अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी 103 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत.

कोण आहेत अविनाश भोसले?

  • रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.
  • अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.
  • कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

(Maharashtra Pune Crime Police take A Action Against Avinash Bhosale Including Vinod Goenka And 14 others)

हे ही वाचा :

Avinash Bhosale : ईडीचा दणका, अविनाश भोसले यांची पुण्यातील 4 कोटींची संपत्ती जप्त

कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.