पुणे : पुणे विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरुन सुटणाऱ्या विमानांची संख्याही वाढवण्यात आली आहे. जून महिन्यात पुण्यावरुन अनेक शहरांसाठी विमाने सुरु करण्यात आली. तसेच जुलै महिन्यातही नवीन विमाने सुरु होणार आहे. पुणे विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढत असताना सीमा शुल्क विभागही सतर्क झाला आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर सीमा शुल्क विभागाची आहे. यामुळे दुबईवरुन आलेल्या एका महिलेवर कारवाई करण्यात आली. तिच्याकडून लाखो रुपयांचे सोने जप्त करण्यात आले.
दुबईहून स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने पुणे विमानतळावर एक महिला आहे. ती महिला पुणे विमानताळावरुन घाईने बाहेर पडण्याच्या तयारीत होती. सीमा शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. यामुळे त्या महिला प्रवाशाची चौकशी सुरु केली. तपासणीच्या ग्रीन चॅनलमध्ये जात असताना तिच्या शरीरात काही लपवले असल्याचे स्पष्ट झाले.अधिकाऱ्यांनी तिची कसून चौकशी सुरु केली. यावेळी गुप्तांगमध्ये सोन्याची पेस्ट करुन कॅप्सूल लपवल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिने सर्व कॅप्सूल काढून दिले.
दुबरीवरुन आलेल्या ४१ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याकडून २० लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. ४२३ ग्रॅमच्या सोन्याची पेस्ट तिने करुन कॅप्सूलमध्ये लपवली होती. पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कस्टम विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी कस्टमने पुणे शहरातूनच पाच कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. अंमल पदार्थ विरोधी पथकासोबत कस्टम विभागाने ही कारवाई केली होती.