पोलीस भरती परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपीला मदत, औरंगाबादेतील पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या 720 पदांसाठी राज्यात भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. परीक्षेत उत्तरे सांगणाऱ्या औरंगाबाद शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस भरती परीक्षेत 'मुन्नाभाई' स्टाईल कॉपीला मदत, औरंगाबादेतील पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
परीक्षेत कॉपीसाठी वापरलेला मास्क
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 9:27 AM

औरंगाबाद : पोलीस भरती घोटाळा प्रकरणी (Police Recruitment Exam Copy) औरंगाबाद येथील पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मास्क डिव्हाईसमधून उत्तरे सांगितल्याने (Mobile in mask) पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या 720 पदांसाठी राज्यात भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. परीक्षेत उत्तरे सांगणाऱ्या औरंगाबाद शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहर पोलीस दलातील कर्मचारी राहुल उत्तम गायकवाड याचे पोलीस भरती घोटाळ्यात नाव आले आहे. पोलीस भरतीसाठी इलेक्ट्रॉनिक मास्कचा वापर करून कॉपी करण्यामध्ये आणखी कोणाचा हात आहे, यावर पोलिसांचा तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिस भरती लेखी परीक्षेत नितीन मिसाळ हा परीक्षार्थी मास्क घेऊन आला होता. ‘मुन्नाभाई’ नितीन मिसाळला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. याशिवाय, रामेश्वर शिंदे आणि गणेश शिंदे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ते दोघे परीक्षार्थी नितीन मिसाळला उत्तरं सांगण्यासाठी मदत करणार होते. हिंजवडी ब्लू रिडज शाळेतील परीक्षा केंद्रावर तपासणीसमध्ये ही कॉपीची ही नवी धक्कादायक पद्धत समोर आली होती.

मास्कच्या आत काय काय?

मास्क चेक करत असतानाच हा कॉपी बहाद्दर हॉल तिकीट विसारल्याचा बहाणा करून पसार झाला होता. त्याला देखील अटक करण्यात आली. N95 चा हा मास्क पोलिसांनी तपासला असता त्यात मोबाईलची बॉडी वगळता जी उपकरणं असतात, ती सर्व बसवण्यात आली होती. म्हणजेच मोबाईल डिव्हाईस, सिम कार्ड, बॅटरी, चार्जिंग कनेक्टर यांचा मास्कच्या आत समावेश करण्यात आला होता.

पोलिसालाच बेड्या

मास्कमध्ये मोबाईल बसवून देऊन परीक्षार्थीला मदत करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी अटक केलेला राहुल गायकवाड हा औरंगाबादमध्ये पोलिस कॉन्स्टेबल आहे. 2012 साली शहर पोलीस दलात भरती झालेला राहुल गायकवाड हा सासऱ्यासोबत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी चालवत होता. तसेच त्याचे 4 नातेवाईकही पोलीस दलात आहेत. हे सर्वजण ग्रामीण भागातील तरुणांना कॉपीच्या जाळ्यात खेचत असल्याचे समोर येत आहे.

आणखी काही परीक्षांमध्ये अशी पद्धत वापरली असल्याचं समोर आलं आहे. त्यासंदर्भात हिंजवडी पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र कॉपी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या हायटेक पद्धतींमुळे सर्वच चक्रावून गेले असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

संबंधित बातम्या :

टीईटी परीक्षा गैरप्रकार तपासात पुणे पोलिसांचं अटकसत्र सुरुच, उत्तर प्रदेशातून आणखी एकाला अटक

Exam Scam: ग्रामीण तरुणांना हायटेक कॉपीची भुरळ, कॉन्स्टेबल राहुलच्या सासऱ्याची पोलीस प्रशिक्षण अकॅडमी!

Police Bharati: लेखी परीक्षेला एक, मैदानी चाचणासाठी दुसरा; पोलीस भरतीत उमेदवारांच्या तोतयागिरीचं बिंग फुटलं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.