पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं (MPSC pass out candidate Swapnil Lonkar suicide in Pune due to no appointment).
पीडित तरुण स्वप्नील लोणकरने पुण्यातील फुरसंगी येथे आत्महत्या केली. ही घटना 29 जून रोजी घडली.
लोकसेवा आयोगाने 2020 या वर्षात घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत निवड झालेल्या तरुणांनी आज (19 जून) नाशिकच्या शासकीय विश्रामगृह परिसरात राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं. ‘मी तहसीलदार तरीही मी बेरोजगार’ अशा आशयाचं फलक घेऊन त्यांनी या दिरंगाईबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.
जवळजवळ 413 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत या नियुक्ती सरकारने पुढे ढकलल्या, असा आरोप या तरुणांनी केलाय. मात्र सर्व निकाली लागूनही आम्हाला नियुक्ती का दिली जात नाहीये? असा सवाल हे भावी अधिकारी सरकारला विचारत आहेत.