आरोपीला क्लीन चीट, पोलीस उपायुक्तांसह चौघांवर गुन्हे दाखल होणार

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. यातील खरेदी विक्री प्रकरणात पोपट तावरे यांनी फसववणूक केली असल्याबाबतची तक्रार किरण शांताराम भोसले व आरती लव्हटे यांनी पोलिसांकडे केली होती.

आरोपीला क्लीन चीट, पोलीस उपायुक्तांसह चौघांवर गुन्हे दाखल होणार
तरुणीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 7:38 PM

बारामती / नविद पठाण (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्ट (Chinchwad Devasthan Trust)च्या जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार (Land purchase and sale malpractices) प्रकरणी आरोपीला क्लीनचीट (Clean Cheat) दिल्याप्रकरणी पोलीस उपायुक्तांसह चौघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दौंड न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि बारामतीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले आणि मोरगावचे माजी सरपंच पोपट तावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मोरगाव येथील जमिनीच्या खरेदी विक्रीत फसवणूक केल्याचा आरोप

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. यातील खरेदी विक्री प्रकरणात पोपट तावरे यांनी फसववणूक केली असल्याबाबतची तक्रार किरण शांताराम भोसले व आरती लव्हटे यांनी पोलिसांकडे केली होती.

राजकीय दबावातून आरोपीला क्लीन चीट

पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर राजकीय दबावामुळे यातील मुख्य आरोपी असलेल्या पोपट तावरे यास क्लीन चीट दिली होती. आणि या गुन्ह्यात त्यांचा सहभाग नाही असं न्यायालयास दर्शविले होते.

हे सुद्धा वाचा

परंतु पोपट तावरे हे खरेदीदार असतानाही त्याला बाजूला ठेवण्यासाठी संबंधित आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे न्यायालयात सादर केली. याबाबत फिर्यादींनी न्यायालयात दाद मागितली होती.

न्यायालयाकडून पोलिसांच्या कामावर ताशेरे

याबाबत दौंड येथील न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले असून पोलीसांनी तावरे याला तीन गुन्ह्यातून निर्दोष सोडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच न्यायालयाने पोलिसांच्या कामावर ताशेरे ओढले आहेत.

चौघांवर गुन्हा दाखल

बारामतीचे तत्कालीन डीवायएसपी आणि पुण्याचे उपायुक्त नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले, पोपट तावरे यांच्यावर कलम 420, 464, 120 ब, 192, 196 अशा विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.