‘जिथे जाऊ तिथे खाऊ’, लाच घेताना हवालदाराला अटक, बारामती पोलीस दलात खळबळ

बारामती येथे पोलीस हवालदाराला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी या हवालदाराने 1 लाख 80 हजारांची लाच लाच मागितली होती.

'जिथे जाऊ तिथे खाऊ', लाच घेताना हवालदाराला अटक, बारामती पोलीस दलात खळबळ
BARAMATI POLICE
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 5:08 PM

पुणे : बारामती येथे पोलीस हवालदाराला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी या हवालदाराने 1 लाख 80 हजारांची लाच लाच मागितली होती. दादासाहेब ठोंबरे असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून ते बारामती तालुक्यातील पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. याच पोलीस ठाण्यात ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या त्यांना अटक करण्यात आलंय. (Police constable has been arrested in Baramati for accepting bribe of rupees One lakh)

तडजोडी नंतर एक लाख दहा हजार देण्याचे ठरले

मिळालेल्या माहितीनुसार एका मारहाण प्रकरणात तक्रारदाराचे नाव होते. हे नाव कमी करण्यासाठी व त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्याची हमी देत हवालदार दादासाहेब ठोंबरे यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली. ठोंबरे यांनी तब्बल एक लाख 80 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडी अंती एक लाख दहा हजार देण्याचे ठरले. एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने तसेच लाच देणे चुकीचे असल्यामुळे तक्रारदाराने लाचखोर हवालदाराविरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार ठोंबरे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

यापूर्वीही ठोंबरे यांच्यावर लाच घेतल्यामुळे कारवाई

दरम्यान, यापूर्वीही दादासाहेब ठोंबरे यांच्यावर लाच घेतल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आलंय. या अटकेमुळे ज्या पोलीस ठाण्यात नेमणूक होईल तिथे पैसे लाटण्याचं काम ठोंबरे पोलीस हवालदाराकडून होत असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या :

मुलींच्या नावाने सेक्शुअल चॅट, नंतर ब्लॅकमेलिंक करत लाखोंची मागणी, अशा नराधमांपासून सावध राहा

दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप

हॉटेलला एकटी ये, रात्रभर थांब, तुझी लाईफ बनवतो, ‘त्या’ अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा थरारक अनुभव

(Police constable has been arrested in Baramati for accepting bribe of rupees One lakh)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.