Pune Accident : रिव्हर्स घेताना काळजाचा तुकडाच टेम्पोखाली चिरडला!

पुण्यात अपघाताचं सत्र! रिव्हर्स घेताना वडिलांनीच मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर, नेमका कुठे घडला अपघात?

Pune Accident : रिव्हर्स घेताना काळजाचा तुकडाच टेम्पोखाली चिरडला!
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 12:55 PM

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण (Pune Accident News) येथे एक काळीज पिळवटून कारणारी घटना घडलीय. एका चार वर्षांच्या मुलाचेे वडील ट्रक चालवत होते. हा ट्रक रिव्हर्स घेतानाच ट्रक चालकाचा मुलगा मागे उभा होता. पण ट्रकचा धक्का लागला आणि तो खाली पडून ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला. नकळतपणे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत ट्रक चालकाच्या मुलाचा जीव गेलाय. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली होती. अतुल निशाद (Atul Nishad) असं मृत्यू झालेल्या चार वर्षांच्या मुलाचं नाव आहे.

कसा घडला अपघात?

चार वर्षांचा अतुल आपल्या वडिलांच्या टेम्पोच्या मागच्या बाजूला होता. ही बाब त्याच्या वडिलांच्या निदर्शनास आली नाही. त्यामुळे ही दुर्दैवी अपघात घडला. आपल्या चुकीमुळे मुलाला गमावल्यामुळे अतुलच्या वडिलांवर मोठा धक्काच बसलाय. तर त्याच्या आईच्या मनावरही खोलवर आघात झालाय.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी दुपारी अतुलचे बाबा त्याचा मिनी ट्रक मागे घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी मिनी ट्रक सुरु केला आणि रिव्हर्स गिअर टाकला. ट्रक मागे घेत असताना अतुल मागे उभा आहे, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी :

घराबाहेरच उभा असलेला मिनी ट्रक रिव्हर्स घेण्यासाठी अतुलचे वडील गाडीत बसले. त्यांनी ट्रक रिव्हर्स घेण्यासाठी सुरुवात केली. पण या दरम्यानच अतुलला मिनीट्रकचा धक्का बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. धक्कादायक बाब म्हणजे पुढे अतुलच्या अंगावर मिनी ट्रकचं चाक गेलं. चाकाखाली येऊन चिरडला गेल्यानं चार वर्षांच्या अतुलला गंभीर जखम झाली. त्यातच त्याचा जीवही गेला.

वडिलांवर गुन्हा

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेदनकरवाडी इथं ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी अपघातप्रकरणी पोलिसांनी अतुलच्या वडिलांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. एका छोटाशा चुकीमुळे निष्पाप मुलाला गमवावं लागल्यानं संपूर्ण चाकणमध्ये हळहळ व्यक्त होतेय.

पुण्यात अपघाताचं सत्र

पुणे जिल्यातील अपघाताचं सत्र सुरुच असल्याचं यानिमित्ताने पाहायला मिळालंय. गुरुवारी सकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात घडला होता. स्कूटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना एक सिमेंटचा कंटेनर थेट रिक्षावर उलटला होता. त्यात रिक्षा चालकाचा ट्रकखाली दबून मृत्यू झाला होता. तर अन्य तिघे जखमी झाले होते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.