पुणे सातारा हायवेवर कंट्रोल सुटला, भरधाव स्विफ्ट पहिल्या लेनमध्येच उलटली! चारही जण…

साताऱ्याहून पुण्याला येत होते, वाटेतच घडली मोठी दुर्घटना! कारमधील चार प्रवाशांचं काय झालं? वाचा सविस्तर

पुणे सातारा हायवेवर कंट्रोल सुटला, भरधाव स्विफ्ट पहिल्या लेनमध्येच उलटली! चारही जण...
भीषण अपघात...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 1:18 PM

विनय जगताप, TV9 मराठी, पुणे : शनिवारी नाशिकमध्ये (Nashik Bus Accident) झालेल्या बसच्या भीषण अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघाताची ही घटना ताजी असतानाच आता पुणे-सातारा हायवेवर (Pune-Satara Highway) भीषण अपघात घडलाय. एक भरधाव स्विफ्ट कार (Maruti Suzuki Swift car Accident) पुणे सातारा हायवेवर उलटली. हा अपघात घडला त्यावेळी कारमध्ये चार प्रवासी होते. हा अपघात इतका भीषण होता, की खाली डोकं वर पाय केल्याप्रमाणे स्विफ्ट कारची अवस्था झाली होती. कारची चारही चाकं आभाळाच्या दिशेने तर स्विफ्ट कारचं छत हे पूर्णपणे रस्त्याला टेकलं होतं.

कशामुळे झाला अपघात?

पुणे सातारा महामार्गावरील निगडे गावच्या हद्दीमध्ये सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. स्विफ्ट कारच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकून हायवेवरच पहिल्या लेनमध्ये उलटली होती.

4 प्रवाशांचं काय झालं?

या भीषण अपघातातून कारमधील चारही प्रवासी अगदी थोडक्यात बचावले. कारमधील प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. साताऱ्याहून ही स्विफ्ट कार पुण्याच्या दिशेने येत होती. या अपघातात स्विफ्ट कारचं प्रचंड नुकसान झालं.

हे सुद्धा वाचा

या अपघातामुळे पुणे-सातारा हायवेवरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. बराच वेळ या महामार्गावरची वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, मोठ्या अपघातातून वाचल्यानं कारमधील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय कारमधील प्रवाशांना आला. या अपघातामुळे पुन्हा एकदा वाहनं वेगाने चालवणं जीवावर बेतू शकतं, हे अधोरेखित झालंय. या अपघातामुळे हायवेवरही बघ्यांची गर्दी जमली होती. तर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेगही मंदावला होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.