पुणे : नवले पुलावर (Navle Bridge Accident) रविवारी रात्री भीषण अपघात घडला. या अपघाताने एकच खळबळ उडाली. एका ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे या ट्रकने पुलावरील उतारावर असताना तब्बल 40 गाड्यांना जोरदार धडक (Pune Accident News) दिली. हा अपघात इतका भीषण होता, की कित्येक गाड्यांचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र 10 जण जखमी झाले. दरम्यान, आता नवले पुलावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली असली, तरी नवले पुलावरील वाढते अपघात चिंता वाढवणारे आहेत. अशातच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Social Media Viral Video) होतोय. पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होणाऱ्या या एका महिलेच्या व्हिडीओमध्ये नेमकं असं आहे तरी काय, ते जाणून घेऊयात.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्यावरुन बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्यां खडेबोल सुनावताना दिसली आहे. हा व्हिडीओ साल 2021मधील असल्याची तारीखही व्हिडीओमध्ये दिसून येते. हा व्हिडीओ एका भाजप नेत्याच्या कार्यक्रमातील असल्याचाही दावा केला जातोय.
My god.. horrific visuals from Pune. A tanker just hit 45 vehicles, several injured pic.twitter.com/BVM1c015Uh
— Arjun* (@mxtaverse) November 20, 2022
व्हायरल व्हिडीओमध्ये महिला वेगान गाड्या चालवणं हे धाडसाचं काम नसून ते बेजबाबदार, लाचार आणि बेशिस्त असल्याचं लक्षण असल्याचं म्हटलंय. रस्त्यावर गाडी चालवताना वेगाला आवर घातला पाहिजे. गाडी चालवणाऱ्याने स्वतःच्या जीवाची पर्वा केलीच पाहिजे कारण हा जीव त्याला त्याच्या आईवडिलांनी दिलेला आहे, हे चालकांनी नेहमी लक्षात ठेवावं, असंही महिला म्हणाली आहे.
#Puneaccident #PuneBengaluruHighway
Punish the traffic offenders.This BJP Minister is genius??????
Make her brand ambassador of road safety in India.
All governments should use her video for awareness. pic.twitter.com/WKC3zzaBV9— IamNB (@IamFMN) November 21, 2022
पुण्यातील नवले पुलावर एका भरधाव ट्रकने तब्बल 48 गाड्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात नुकसान झालेल्या गाड्या अखेर आता बाजूला काढण्यात आल्यात. या अपघातात गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. 48 पैकी 24 गाड्यांना या अपघातात जबर फटका बसलाय. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता.
Six people were injured in a major accident at Navale bridge on the Pune-Bengaluru highway in Pune where a truck lost control and rammed into several vehicles stuck in traffic on the bridge. #Puneaccident #RoadAccident #accident pic.twitter.com/Hw35vr5Y6H
— Sezal Chand Thakur (@imSCthakur) November 21, 2022
आता या महिलेचा व्हिडीओ सरकारने रस्ते सुरक्षा अभियान म्हणून वापरावा, अशी मागणी एका ट्वीटर युजरने केली आहे. या व्हिडीओमध्ये बोलणारी महिला नेमकी कोण आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ राजस्थानमधील सीकर या शहरातील असल्याचं कळतंय. 16 सप्टेंबर 2021 रोजी हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचं निदर्शनास आलंय.