Pune : भोर तालुक्यातील अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, नागरिकांचे निषेध आंदोलन

पुण्यातील भोर तालुक्यात एका अडीच वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाच्या नेत्यांनी नागरिक आणि सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला.

Pune : भोर तालुक्यातील अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, नागरिकांचे निषेध आंदोलन
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 4:29 PM

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एका गावात अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचे निषेध आंदोलन करण्यात आलं आहे. पुणे सातारा महामार्गावरील वरवे गावाच्या परिसरात, नागरिक आणि सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत, घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीस कठोर शिक्षेची मागणी केली. परिसरातील महिला आणि युवती तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनं हद्दीतील एका गावात दोन वर्ष वय असलेल्या बालिकेवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती आरोपी 17 वर्षीय अल्पवयीन असला तरी, अपराध्याला कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी आंदोलन करत पोलिसांकडे केली आहे.

काय घडली होती घटना?

भोर तालुक्यातील एका गावात २५ महिने वय असलेल्या बालिकेवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी 17 तारखेला घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या अत्याचार प्रकरणी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलयं आणि त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आल्याची माहिती आहे..

पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाणे हद्दीत पुणे – सातारा महामार्गावरील एका गावात ही धक्कादायक ही घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि.१७) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समजताच राजगड पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. यावेळी आरोपीने पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून संबंधित नराधम आरोपीला ताब्यात घेतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार माहिती अशी की, दोन्ही कुटुंब बाहेर गावचे असून महामार्गलगत असणाऱ्या एका गावात भाडोत्री म्हणून राहत आहेत. पीडित बालिका आणि नराधम मुलाने हे शेजारी राहत आहेत. दोन वर्षीय मुलगी संबंधित मुलाकडे खेळायला जात असे. लहान मुलीची आई सकाळी कपडे धुत असताना मुलाने मुलीला त्याच्या खोलीत घेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने मुलीच्या आईने बंद असलेल्या खोलीकडे धाव घेऊन दरवाजा प्रयत्न केला. पण, मुलाने दरवाजा उघडला नाही. आरडाओरडा केल्यानंतर मुलगा मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला होता. मुलाने त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचे पोलिसांनी गांभीर्या दखल घेतली असून गुन्हा दाखल करून पोलिसांनी अल्पवीन आरोपीला लगेचचं ताब्यात घेतलं.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.