Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फटाके फोडताना सांभाळून! रंगीबेरंगी पाऊस पाडणारा फटाका पेटवताना पुण्यात घडला अनर्थ

लहान मुलांना एकटं फटाके फोडायला पाठवताय? सावधान! आधी ही बातमी वाचा, पुण्यातील थरारक घटना

फटाके फोडताना सांभाळून! रंगीबेरंगी पाऊस पाडणारा फटाका पेटवताना पुण्यात घडला अनर्थ
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 1:19 PM

पुणे : दिवाळी साजरी (Diwali Celebration) करताना फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घेण्याची गरज व्यक्त केली आहे. एक दुर्दैवी घटना पुण्यात (Pune News) घडली आहे. रंगीबेरंगी पाऊस पेटवत असतेवेळी अचानक स्फोट झाला आणि त्यात एक लहान मुलगा जखमी झालाय. जखमी झालेल्या मुलाचं नाव शिवांश अमोल दळवी (Shivansh Amol Dalvi) असं आहे. या स्फोटाच्या घटनेतून शिवांश अगदी थोडक्यात वाचला. तो जखमी झाल्यामुळे त्याचे पालकही धास्तावले आहेत.

ही घटना सोमवारी घडली. सोमवारी लक्ष्मीपूजनानंतर शिवांश फटाके फोडत होता. त्यावेळी रंगीबेरंगी पाऊस लावताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात शिवांश जखमी झाला. पुण्यातील नव्हेमध्ये ही घटना घडली.

आता शिवांशची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेमुळे आता इतर पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असं आवाहन केलं जातंय. लहान मुलांना शक्यतो एकटं फटाके फोडायला पाठवू नये, असंही गरज व्यक्त केली जातेय. फटाके फोडण्याच्या उत्साहावर गालबोट लागू नये, यासाठी अधिक खबरदारी बाळगावी आणि पालकांनी मुलांसोबत सतर्क राहावं, हे पुण्यातील घटनेनं अधोरेखित केलंय.

हे सुद्धा वाचा

पुण्यात सोमवारी लाग लागण्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या. फटाक्यांच्या आतषबाजीत एकूण 17 ठिकाणी आग लागल्याचं समोर आलंय. यात कुठेही जीवितहानी झाली नसली, तरी आता काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.

दरम्यान, पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक फटाके वाजवण्यात आले. गेल्या 3 वर्षांची सर्वाधिक आकडेवारी सोमवारी नोंदवली गेली. सफर या संस्थेनं नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात अतिसूक्ष्म कणांचं हवेतीली प्रमाण हे 210 इतकं नोंदवलं गेलं.

100 पर्यंतची अतिसूक्ष्म कणांची पातळी उत्तम समजली जाते. त्यानंतर 100 ते 200 समाधानकारक, 200 ते 300 वाईट, 300 ते 400 अत्यंत वाईट, तर 400 ते 500 या प्रमाणात अतिसूक्ष्म कणांची हवेतील पातळी ही अतिधोकादायक समजली जाते.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.