ब्रेकअपचा वचपा काढण्यासाठी त्याने युट्युबवर व्हिडीओ बघितला आणि थेट प्रेयसीच्या घरात घुसून…
ब्रेकअप केल्यामुळे सतीशला आला राग, प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी पुणेकर तरुणाचा भलताच प्रताप!
अभिजीत पोटे, TV9 मराठी, पुणे : प्रियकर-प्रेयसी यांच्या ब्रेकअप होणं, ही काही नवी गोष्ट नाही. पण पुण्यात ब्रेकअप नंतर प्रियकरांनी प्रेयसीला (Break up) धडा शिकवण्यासाठी भलताच प्रताप केलाय. सतिश परदेशी (Satish Pardeshi) नावाच्या तरुणाचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपमुळे दुखावल्या गेलेल्या सतिशने प्रेयसीला अद्दल घडवण्यासाठी प्रेयसीच्या घरावर डल्ला मारला. तब्बल 14 लाख रुपयांपेक्षी अधिकची चोरी सतिशने केली असल्याचं उघडकीस आलंय. या चोरीप्रकरणी आरोपी सतिशला पोलिसांनी (Pune crime News) अटकही केलीय. त्यानंतर त्याने हे कृत्य करण्यासाठी नेमकं प्लॅनिंग कसं केलं होतं, याचा धक्कादायक खुलासाही केलाय.
ब्रेकअपचा राग
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका घरात चोरीची घटना घडली. या चोरीप्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या चोरीप्रकरणी ज्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, त्याचे या घरात राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, असं समोर आलंय. काही कारणावरुन आरोपी आणि त्याच्या प्रेयसीचं ब्रेकअप झालं होतं. याचाच राग मनात ठेवून आरोपीने चोरीचा कट रचला.
युट्युबवर व्हिडीओ बघून प्लॅनिंग
सतीश परदेशी असं चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. सतीश परदेशीने प्रेयसीच्या घरी चोरी करायचं ठरवलं. त्यासाठी त्याने चक्क युट्युबची मदत घेतली. युट्युबवर व्हिडीओ बघून मेकी चोरी कशी करायची, याचा रितसर प्लान त्याने आखला होता.
14 लाख लुटले
भारती विद्यापीठ पोलिसांनी केलेल्या आरोपीच्या चौकशीतून ही बाब समोर आलीय. याप्रकरणी आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल 14 लाख 20 हजार रुपयांचं सोन सतिशने प्रेयसीच्या घरातून लंपास केलं होतं. याशिवाय परदेशी चलनावरही डल्ला मारला होता. आरोपीने केलेल्या कृत्याचा उलगडा केल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले होते. या प्रकरणी आता पुढील कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांकडून केली जातेय.