Pune murder : 18 वर्षांच्या तरुणीचा गळा दाबून खून! चाकणमधील धक्कादायक घटना, हत्येचं नेमकं कारण काय?

Chakan Murder : आई बोलत नाही याचा राग विष्णूकुमारच्या मनात खदखदत होता.

Pune murder : 18 वर्षांच्या तरुणीचा गळा दाबून खून! चाकणमधील धक्कादायक घटना, हत्येचं नेमकं कारण काय?
तरुणीचा खून..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 7:42 AM

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये (Chakan Murder) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीचा गळा दाबून खून (Murder News) करण्यात आलाय. ही तरुणी 18 वर्षांची होती. या घटनेनं संपूर्ण चाकण हादरुन गेलंय. घरात कुणीही नसताना आरोपी विष्णूकुमार सहा याने प्रीती सहा हिची गळा दाबून हत्या केली. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी (Pune Crime News) आरोपी विष्णूकुमार सहा याला अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. याप्रकरणी हत्येचं कारणंही समोर आलं आहे. रागाच्या भरात विष्णूकुमारने हे कृत्य केलं. त्याआधी विष्णूकुमारला ज्या गोष्टीचा राग आला होता, ते कारणंही हारवणारं आहे.

का केला खून?

विष्णूकुमार आणि हत्या झालेल्या प्रिती सहा हीची आई, एकाच कंपनीमध्ये काम करत होते. प्रितीच्या आईने विष्णूकुमारशी बोलत नव्हतं. आई बोलत नाही, म्हणून विष्णूकुमारशी प्रितीनेही बोलणं थांबवलं होतं. आई बोलत नाही याचा राग विष्णूकुमारच्या मनात खदखदत होता. विष्णूकुमारशी वाद झाल्यामुळे प्रितीच्या आईने आरोपी विष्णूसोबत बोलणं थांबवलं होतं.

उलगडा कसा झाला?

प्रितीची आई बोलत नाही, याचा राग आधीत विष्णूकुमारच्या डोक्यात होता. आधीच चिडलेल्या विष्णूकुमारने सकाळी घरात कुणीही नसताना प्रितीचा गळा दाबला आणि तिचा खून केला. यानंतर तो त्याच्या खोलीत जाऊन शांतपणे बसला होता. याप्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी विष्णूकुमारला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याची चौकशीही सुरु केलीये. या घटनेनं चाकण हादरुन गेलंय.

हे सुद्धा वाचा

सगळ्यात मोठी राजकीय घडामोडी : Video

घराशेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने विष्णूकुमार प्रितीचा गळा दाबतोय हे पाहिलं होतं. तिला संशय आला. तिने याबाबतची माहिती दिल्यानंतर हा सगळा घटनाक्रम उघडकीस आला. पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तपास करत अखेर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सध्या या प्रकरणी अधिक तपास केला जातोय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.