दरोड्यासाठी गावठी कट्टा, कोयता, सुरीचा उपयोग; मनसेच्या पदाधिकाऱ्यासह 4 जणांना बेड्या

पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. या पथकाने लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केले.

दरोड्यासाठी गावठी कट्टा, कोयता, सुरीचा उपयोग; मनसेच्या पदाधिकाऱ्यासह 4 जणांना बेड्या
पोलिसांनी दरोडेखोरांना अटक केली.
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 9:07 PM

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. या पथकाने लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केले. पोलिसांनी या टोळीकडून गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी असा 1 लाख 15 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी दत्ता गायकवाड (वय 23), गौरव परजणे (वय 20), किशोर जाधव (वय 22), दत्ता व्यवहारे (वय 37, सर्व रा. वाघोली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार अजय माकर (वय 25) फरार झाला आहे. यामधील दत्ता व्यवहारे हा मनसेच्या सहकार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचे बोलले जात आहे. (Pune city police arrested Four accuse who were planning of robbery)

दरोड्याची तयारी होत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई ऋषिकेश व्यवहारे व पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे यांना एक गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार लोणीकंद ते बकोरी रस्त्यावर खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चार जणांना ताब्यात घेतले.

गावठी कट्टा, सुरी, मिरचीपूड जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आरोपींकडून गावठी कट्टा, सुरी, मिरचीपूड असा दरोडा टाकण्यासाठी लागणारा ऐवज जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

पोलिसांची मोठी कामगिरी

ही कामगिरी पोलीस पुणे शहर आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीनिवास घाडगे ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुंडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांचा सहभाग होता.

इतर बातम्या :

आधी सोशल मीडियावर ओळख, नंतर वारंवार लैंगिक अत्याचार, वाद झाल्यामुळे अपहरणाचा व्हिडीओ केला व्हायरल, नागपूर हादरलं !

अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात कामाची संधी, आता करतो मोबाईलची चोरी, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इगतपुरीतील रेव्ह पार्टी प्रकरण, 5 आरोपींना जामीन 20 जणांचा जामीन अर्ज फेटाळला, हीना पांचाळचं काय झालं?

(Pune city police arrested Four accuse who were planning of robbery)

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....