Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीसोबत भांडताना ओरडल्याचा राग, पुण्यात 13 वर्षांच्या मुलाने कांदा चिरताना वडिलांना भोसकलं

मयत व्यक्ती पुण्यातील कात्रज-देहू रोड बायपसजवळ एका रहिवासी इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होती. (Pune boy stabs father)

बहिणीसोबत भांडताना ओरडल्याचा राग, पुण्यात 13 वर्षांच्या मुलाने कांदा चिरताना वडिलांना भोसकलं
औरंगाबादमध्ये हत्येचं सत्र सुरुच
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 3:36 PM

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात हत्येची आणखी एक घटना समोर आली आहे. बहिणीसोबत झालेल्या भांडणानंतर बाबा ओरडल्याचा राग 13 वर्षांच्या मुलाच्या मनात धुमसत होता. याच रागातून मुलाने वडिलांची सुरीने भोसकून हत्या केली. मृत्युमुखी पडलेली 40 वर्षीय व्यक्ती एका रहिवासी इमारतीत वॉचमन म्हणून कामाला होती. (Pune Crime News 13 year old boy stabs father to death near Bharati University)

बहीण-भावाच्या वादात पित्याची मध्यस्थी

मयत इसम पुण्यातील कात्रज-देहू रोड बायपसजवळ एका रहिवासी इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होता. दोन मुलगे, दोन मुली आणि पत्नीसह इमारतीच्या पार्किंग लॉटमध्येच तो राहत होता. गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता तो घरात कांदा चिरत बसला होता. त्यावेळी त्याचा 13 वर्षांचा मुलगा आणि एक मुलगी भांडत असल्याचं त्याला दिसलं. त्याने दोघांचं भांडण सोडवत मध्यस्थी केली.

चिडलेल्या मुलाने वडिलांना सुरीने भोसकलं

वडील ओरडल्याचा राग मुलाला आला. त्याने वडिलांनी कांदा चिरण्यासाठी घेतलेली सुरी उचलली आणि त्यांच्याच पोटात खुपसली. एकच घाव वर्मी बसला आणि वॉचमन जागच्या जागी कोसळला, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने दिलं आहे. स्थानिकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर 13 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

सलग दुसऱ्या दिवशी भारती विद्यापीठ परिसरात हत्या

पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच बुधवारी हत्येची घटना समोर आली होती. 35 वर्षीय मोहन चवंडकर यांची डोक्यात विटा घालून दगडाने ठेचून हत्या झाली होती. त्यानंतर पुन्हा (गुरुवारी) याच भागात आणखी एका हत्येची घटना उघडकीस आली.

35 वर्षीय कार ड्रायव्हरची आत्महत्या

दरम्यान, चारच दिवसांपूर्वी 35 वर्षीय निरंजन बाळकृष्ण साळुंखे या तरुणाने भारती विद्यापीठ परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो वंडर सिटीजवळ वर्धापन बिल्डिंगमध्ये राहत होता. निरंजन हा वाहन चालक म्हणून काम करत होता. मात्र गेल्या महिन्यांपासून त्याच्याकडे रोजगार नव्हता. मित्र निरंजनला दररोज जेवणाचा डबा आणून देत असे. सोमवारी दुपारी डबा घेऊन आला असता त्याला निरंजनने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्याने उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात तरुणावर टोळक्याचा कोयता हल्ला, शेजारच्या रहिवाशांनी घरात घेतल्याने तरुण बचावला

शहर पुणे, परिसर भारती विद्यापीठ, एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना

तीन आत्महत्यांपाठोपाठ पुण्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या, भारती विद्यापीठ परिसर पुन्हा हादरला

(Pune Crime News 13 year old boy stabs father to death near Bharati University)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.