Pune crime : पुणे हादरलं! पुणे स्टेशन परिसरात 7 वर्षीय मुलीचं अपहरण करुन लैंगिक शोषण

Pune crime News : पीडितेच्या तक्रारीवरुन आता पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Pune crime : पुणे हादरलं! पुणे स्टेशन परिसरात 7 वर्षीय मुलीचं अपहरण करुन लैंगिक शोषण
पुणे रेल्वे स्थानक
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 7:56 AM

पुणे : वडिलांना जेवणाचा डबा देऊन परणाऱ्या मुलीवर एका अतिप्रसंग केला. एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण (Pune Molestation News) करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण पुणे (Pune crime News) या घटनेनं हादरुन गेलंय. पुणे रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. पुणे स्थानक परिसात सात वर्षांच्या चिमुकलीचे वडील चहा विक्रीचा स्टॉल चालवतात. ही मुलगी वडिलांना जेवणाचा डबा द्यायला गेली होती. त्यावेळी डबा डेऊन परतत असताना एकाने या मुलीला रेल्वे प्लॅटफॉर्मवरील रुममध्ये नेलं आणि तिथं तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्ठानकात देण्यात आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरोधात सध्या पोलिसांनी पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास केला जातोय. मात्र या घटनेमुळे राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

पुणे स्थानकात हैवानी कृत्य

पुणे रेल्वे स्थानकातील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचं वृत्त समोर आल्यानं एकच संताप व्यक्त केला जातोय. चहाविक्री करणाऱ्या आपल्या बाबांना जेवणाचा डबा द्यायला एक सात वर्षांची मुलगी केली होती. बाबांना डबा देऊन ती परतत होती. त्यावेळी एका अज्ञात आरोपीनं या मुलीचं अपहरण केलं. सात वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिला हा नराधम पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 जवळ असलेल्या एका खोलीत घेऊन गेला. याच खोलीमध्ये नराधम आरोपीने हैवानी कृत्य करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

गुन्हा दाखल

पीडितेच्या तक्रारीवरुन आता पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांकडून सध्या अज्ञात आरोपीविरोधात तपास केला जातो आहे. पुणे रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्हीचीही आता पडताळणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि स्थानिक खबऱ्यांच्या साथीने आता आरोपीच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वासही पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.