Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरण, अल्पवयीन मुलासह चौघांविरोधात मोक्का

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरण, अल्पवयीन मुलासह चौघांविरोधात मोक्का
Raviraj Taware
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 1:51 PM

बारामती : राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे (Raviraj Taware) गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलासह चौघांवर बारामती तालुका पोलिसांनी कारवाई केली. गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. चौघा आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Pune Crime News Baramati NCP Leader Raviraj Taware attackers action under mocca law)

आरोपींमध्ये कोण कोण?

रविराज तावरे यांच्यावर माळेगाव येथे 31 मे रोजी गोळीबार झाला होता. या प्रकरणी प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे, रिबेल उर्फ राहुल यादव आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करत त्यांना अवघ्या सात तासात अटक करण्यात आली होती. बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली होती.

मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव

अल्पवयीन मुलासह चौघांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव बारामती तालुका पोलिसांनी पाठवला होता. त्याला पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिल्याची माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 15 दिवसांच्या आत संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली.

नेमकं काय घडलं?

रविराज तावरे हे पत्नी- जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह 31 मे रोजी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. जखमी अवस्थेतील तावरेंना तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय

रविराज तावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रविराज तावरे यांच्या पत्नी रोहिणी तावरे या पणदरे-माळेगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. माळेगावची ग्रामपंचायत रद्द होऊन नुकतीच नगरपंचायत झाली. येत्या काही काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे. गाव पातळीवरील राजकारणातून हा प्रकार झाला असावा असा संशय आधीपासूनच व्यक्त होत होता.

संबंधित बातम्या :

अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती

बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय नेत्यावर गोळीबार, राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर कसा झाला हल्ला?

(Pune Crime News Baramati NCP Leader Raviraj Taware attackers action under mocca law)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.