बळजबरीने विवाह, मग ‘तसा’ व्हीडिओ बनवला अन्…, पुण्यातील पेठेतून धक्कादायक प्रकार समोर
शरीर संबंधासाठी खोटी वचने देऊन त्यानंतर फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले आपण ऐकले असतील. (Pune Crime News) अशातच पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे : आताच्या पिढीसाठी लग्न म्हणजे खेळ झाला आहे. सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतलेले जोडपे काही काळात वेगळे होत असलेले आपण पाहत आहोत. शरीर संबंधासाठी (Physical Relationship) खोटी वचने देऊन त्यानंतर फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले आपण ऐकले असतील. (Pune Crime News) अशातच पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधी बळजबरीने विवाह त्यानंतर शरीर संबंध ठेवत त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. तरूणीला ब्लॅकमेल करत तब्बल 10 लाख उकळले. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? आरोपी सौरभ सुपेकर आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेल्या तरूणीची ओळख होती. सौरभने तिच्यासोबत लग्न करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर दोघांनी 11 ऑक्टोबर 2021 रोजी जबरदस्तीने रजिस्टार विवाह केला. विवाह झाल्यावर सौरभने तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले इतकंच नाहीतर त्याने शरीर संबंध ठेवतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
व्हिडिओ रेकॉर्ड केल्यावर आरोपी सौरभ तिला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. वेळोवेळी तिला पैशाची मागणी करत होता आणि जर पैसे नाही दिले तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणार असं धमकावू लागला. या भीतीपोटी संबंधित मुलगी त्याला पैसे देऊ लागली. जवळपास फिर्यादी मुलीने त्याला 10 लाख रूपये दिल्याचं दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सांगितलं आहे.
आरोपी सौरभने तरूणीला आपल्या घरी रहायला बोलावलं होतं. मात्र यासाठी तिने नकार दिल्यावर तिच्या घरी जात त्याने शिवीगाळ केली. रस्त्याने जाताना तरूणीचा पाठलाग करू लागला. शेवटी तरूणीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि सौरभविरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, तरूणी ही 22 वर्षांची असून मंगळवार पेठेतील रहिवासी आहे. तर आरोपी सौरभ सुपेकर हा भवानी पेठेतील रहिवासी आहे. तरूणीच्या तक्रारीनंतर समर्थ पोलिसांनी सौरभ सुपेकर याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आताच्या युवा पिढीने सोशल मीडियावरील अनोळखी मित्रांपासून सतर्क रहायला हवं. कारण कोण कधी केसाने गळा कापून तुमचा घात करेल काही सांगता येत नाही. डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवलात तर तुमची फसवणूक होण्याची मोठी शक्यता आहे. आताच्या डिजीटल युगामध्ये साधा एक ओटीपी जरी तुम्ही शेअर केलात तर तुमचं बँक अकाऊंट खाली होऊन जाईल.