Pune Crime : ‘पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ’ अशी धमकी देणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या!

| Updated on: May 06, 2022 | 8:01 AM

Pune News : पुणे रेल्वे पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीनं कारवाई केली.

Pune Crime : पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या!
पुणे रेल्वे पोलीस
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : पुणे स्टेशन (Pune railway Station) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी वाघोलीतून याप्रकरणी दोघांना बेड्या (Pune Crime) ठोकल्या आहेत. पुणे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यासोबत यावेळी पैशांचीही मागणी करण्यात आली होती. बॉम्ब कुठे ठेवलाय, याची माहिती हवी असेल, तर सात कोटी रुपये द्या, अशी मागणी धमकावणाऱ्यांकडून देण्यात आलेली. पोलिसांच्या कंट्रोल रुमला याप्रकरणी फोन कॉल आला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी (Pune News) या फोन कॉलची गंभीर दखल घेत तातडीनं तपास यंत्रणा कामाला लावली. त्यानंतर अखेर याप्रकरणी दोघा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

कधीची घटना?

3 मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पोलिस कंट्रोल रुमला एक फोन आला. या फोन कॉलनं एकच खळबळ उडवली. पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी पुणे रेल्वे पोलिसांना देण्यात आली होती. इतकंच काय तर बॉम्ब कुठे ठेवला आहे, याची माहिती हवी असेल, तर सात कोटी रुपये द्या, अशी मागणी आरोपींनी पोलिसांकडे केली होती.

गंभीर दखल

पुणे रेल्वे पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीनं कारवाई केली. अवघ्या 48 तासांच्या आत पोलिसांनी फोन कॉल करुन खळबळ उडवून देणाऱ्या आणि धमकावणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. करण भिमाजी काळे आणि सुरत मंगमतराम ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. त्यांना पुणे रेल्वे पोलिसांनी अखेर वाघोलीतून अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

रेल्वे स्थानकात बंदोबस्त

दरम्यान, खळबळजनक फोन कॉलनंतर पुणे रेल्वे स्थानकातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसंत कसून चौकशीही केली जाते आहे. अटक करण्यात आलेल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. करण आणि सुरत यांनी खोटा फोन देत पोलिसांनी नेमकं कोणत्या कारणामुळे धमकावलं, याची चौकशी आता पोलिसांकडन केली जातेय.

पाहा व्हिडीओ :