Pune Firing: नवऱ्याचा बायकोसह सासूवर कोर्ट परिसरात गोळीबार! बायको ठार, थरारक पाठलाग करत जावयाला अटक

Pune Murder : गोळीबारामध्ये बायको जागेवरच ठार झाली. तर सासू गंभीररीत्या जखमी झाली आहे.

Pune Firing: नवऱ्याचा बायकोसह सासूवर कोर्ट परिसरात गोळीबार! बायको ठार, थरारक पाठलाग करत जावयाला अटक
खळबळजनक हत्या...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 1:55 PM

पुणे : पुणे (Pune crime news) जिल्ह्यातील शिरुरमध्ये (Shirur Firing) खळबळजनक घटना घडली. नवऱ्याने बायकोसह सासूवर गोळीबार केलाय. या गोळीबारामध्ये बायको जागेवरच ठार (Husband Killed wife) झाली. तर सासू गंभीररीत्या जखमी झाली आहे. शिरुर कोर्ट परिसरात ही घटना घडली. या घटनेनं एकच गोंधळ उडाला. कौंटुबिक वादातून ही खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहेत. गंभीर जखमी झालेल्या सासूवर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालय परिसरामध्ये घडलेल्या या घटनेनं सगळेच धास्तावलेत.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत पत्नीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून गोळीबारानंतर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. कोर्ट परिसरात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेनं एकच घाबरगुंडी उडाली होती. पोलीस सध्या या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अजूनही याप्रकरणी कुणाला अटक करण्यात आली असल्याची माहित समोर आलेली नाही.

का केला गोळीबार?

कौटुंबिक वादातून जावयानं मायलेकींवर गोळ्या झाडल्या असल्याचं सांगितलं जातंय. यानंतर कोर्ट परिसर हादरुन गेला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणी जाऊन तपासाला सुरुवात केलीये.

हे सुद्धा वाचा

पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्या पडला होता. यावेळी कोर्ट परिसरात असलेली लोकांनी या महिलेच्या मृतदेहाशेजारी एकच गर्दी केली होती. उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीनं जखमी अवस्थेत असलेल्या सासूला रुग्णालयात दाखल केलंय. त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

थरारक पाठलाग करत जावयाला बेड्या

सासू आणि पत्नीवर गोळीबर करुन पळून जाणाऱ्या जावयाच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आलंय. जावयासह त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. शिरुर शहर आणि पुणे नाशिक महामार्गावर थरारक पाठलाग करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या या दोघांचीही कसून चौकशी पोलिसांकडून केली जातेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.