दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावी आला आणि आईवडिलांपासून कायमचा हिरावला गेला!

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील अत्यंत दुर्दैवी घटना! 15 वर्षांच्या सार्थकसोबत नेमकं काय घडलं?

दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावी आला आणि आईवडिलांपासून कायमचा हिरावला गेला!
दुर्दैवी घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 1:04 PM

पुणे : खेड तालुक्यात (Khed Taluka) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडला. दोघा शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू (Pune Drown Death) झाला. तर तिसरा मुलगा दैवं बलवत्तर म्हणून अगदी थोडक्यात बुडताना वाचलाय. सार्थक ढोरे (Sarthak Dhore) आणि शिवम गोपाळे अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. या मुलांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेला दोन मुलांपैकी सार्थक हा आपल्या मामाच्या गावी दिवाळीची सुट्टी लागली म्हणून आला होता. सार्थकच्या मृत्यूने त्याच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसलाय.

खेड तालुक्यात आडगाव तालुक्यात दुपारी तीन-साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाझर तलावात पोहण्यासाठी म्हणून गेली. तीन मित्र मिळून पोहोयला गेले. पण त्यातील दोघे जिवंत परतलेच नाही. 15 वर्षांचा सार्थक ढोरे, शिवम गोपाळे आणि प्रतीक गोपाळे हे अचानक तलावाच्या पाण्यात बुडी लागले होते. यातील एक मुलगा थोडक्यात वाचला. पण नाकातोंडात पाणी जाऊन सार्थक आणि शिवम यांचा मृत्यू झाला.

रविवारी ही तिन्ही मुलं पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. पण बराच वेळ परत न आल्यामुळे शोधाशोध सुरु झाली. अखेर तलावात ही मुलं बुडाली असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर स्थानिक बचाव यंत्रणांना कळवण्यात आली. तलावात या मुलांना शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली.

हे सुद्धा वाचा

अथक प्रयत्नांनी बुडालेल्या मुलांचे मृतदेह हाती लागलेत. ज्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं पाहून या मुलांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

15 वर्षांचा सार्थक हा दिवाळीची सुट्टी असल्याने मामाच्या गावी आला होता. पण सुट्टीच्या दिवसात तलावाच्या पाण्यात उतरणं त्याच्या जीवावर बेतलं. या मुलांच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

पोलिसांसोबत गावकरी आणि एनडीआरएफचं पथकाने बुडालेल्या मृलांचा मृतदेह शोधण्यासाठी अथक मेहनत घेतली. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर अखेर आता बुडालेल्या मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत. पोलिसांनीही या घटनेची नोंद करुन घेतली असून पुढील तपास केला जातोय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.