अपघात होताच विशाल अग्रवाल यांचा ड्रायव्हरला फोन? काय झालं फोनवर संभाषण?

ज्युवेनाईल केस अधिक भक्कम होण्यासाठी आम्ही अधिक प्रयत्न करत आहोत. लहान मुलांना दारू देणे, लहान मुलाला गाडी देणं हा गुन्हा असून त्याचा तपास सुरू आहे. दोन्ही प्रकरणाचा तपास करून पीडितांना न्याय मिळेल आणि आरोपीला शिक्षा मिळेल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. स्पेशल कौन्सिलची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

अपघात होताच विशाल अग्रवाल यांचा ड्रायव्हरला फोन? काय झालं फोनवर संभाषण?
Vishal AgarwalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 3:10 PM

आपल्या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची माहिती मिळताच विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला फोन केला होता. तू गाडी चालवत होतास असं पोलिसांना सांग. त्याबद्दल तुला बक्षीस देऊ, असं विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला सांगितल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ड्रायव्हरला खोटा जबाब देण्यास विशाल अग्रवाल यांनीच भाग पाडल्याने अग्रवाल यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं कलम लावणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पुणे पोलिसांनी या हिट अँड रन प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणातील ड्रायव्हरच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केलं. अग्रवाल यांच्या घरच्या सेक्युरिटीने त्याच्या रजिस्टरमध्ये अग्रवाल यांचा मुलगाच गाडी घेऊन गेल्याची नोंद आहे. मुलगा गाडी चालवत असल्याचं आढळून आलं आहे. अपघात झाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हर बदलल्याची बाबही समोर आली आहे. पुरावा नष्ट करण्याचा, त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रायव्हर कार चालवत असल्याचा बनाव करण्यात आला होता. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अग्रवाल यांच्यावर कलम 201 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. सर्व गोष्टी आता सांगणं योग्य नाही. ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला होता, ही गोष्ट समोर आली आहे. कुणाच्या दबावाखाली बोलला आणि का बोलला याचा योग्यवेळी खुलासा करू, असं अमितेश कुमार म्हणाले.

पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर येरवडा पोलीस ठाण्यात पुरावा नष्ट करण्याचे कलम 201 लावण्यात आलंय. तर गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी कलम 420 लावण्यात आलं आहे. आरोपी विशाल अग्रवालवर दोन कलमांची वाढ करण्यात आली आहे. गुन्हे शाखेला जर पुन्हा आज ताबा मिळाला नाही तर येरवडा पोलीस विशाल अग्रवालचा ताबा घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ड्रायव्हरची कबुली

दरम्यान, या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. ड्रायव्हर गंगाराम पुजारी याने पोलिसांना जबाब दिला आहे. अल्पवयीन मुलगाच कार चालवत होता. अपघात झाला तेव्हा ड्रायव्हिंग व्हिल त्याच्या हातात होती, असा कबुलीजबाब ड्रायव्हर पुजारी याने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. पुणे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने हा कबुलीजबाब दिल्याचं सांगितलं जात आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.