हिट अँड रन केसमध्ये मोठा ट्विस्ट, केस ड्रंक अँड ड्राईव्हची नाही, दोन ब्लड सँपल का घेतले?; दावा काय?
पहाटे 2.30 वाजता घटना घडली. त्यानंतर 8 वाजता गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासाच्या आधारावर 304 अ कलम लावण्यात आलं. पण नंतर अधिक तपास केला असता सकाळी 11 वाजता 304 हे कलम लावण्यात आलं. कोर्टात जाण्यापूर्वीच हे कलम लावण्यात आलं होतं. त्यामुळे मीडियात बोंब झाल्यानंतर आम्ही हे कलम लावलं असं म्हणणं योग्य होणार नाही, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
पुण्यातील हिट अँड रन केसमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघाताची केस ही ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा रॅश अँड निगलिजन्सची नाही, असा मोठा खुलासा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. ही केस कल्पेबल होमीसाईड म्हणजे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणात दोन ब्लड सँपल का घेण्यात आले? दोन्ही ब्लड सँपल घेण्यामधील कालावधी काय होता? याची माहितीही अमितेश कुमार यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील हिट अँड रन केसवर मोठं भाष्य केलं. आमची केस भादंवि कलम 304 अ, ड्रँक अँड ड्राईव्ह आणि रॅश अँड निगलिजन्स अॅक्टची नाही. एखाद्या व्यक्तीकडून दारूच्या नशेत गुन्हा घडला त र 304 ए आयपीसीचा गुन्हा होतो. या प्रकरणात तीन वर्षाची शिक्षा होते आणि बेलेबल ऑफेन्स असतो. पण आम्ही या प्रकरणात 304 कलम लावलं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला गुन्ह्याची पूर्व कल्पना असल्याचं त्यात नमूद आहे. आपल्या हातून हत्या होऊ शकते हे आरोपीला माहीत होतं हे त्याच्या वर्तवणुकीवरून दिसून येतं, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
गुन्ह्याची कल्पना होती
ज्युवेनाईल असतानाही महागडी ऑटोमॅटिक गाडी चालवणे, एका पबमध्ये जाऊन दारू पिणे नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू देणे, त्यानंतर अरुंद गल्लीत गर्दी असताना, रहदारी असताना भरधाव वेगाने गाडी चालवणे याची आरोपीला माहिती होती. त्यांच्या कृत्याने जिवीतास हानी होऊ शकते, हे त्याला माहीत होते. त्यांचे दारु पितानाचे सीसीटीव्ही फुटेजही आमच्याकडे आहेत, असं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं.
म्हणून दोन सँपल घेतले
आरोपीचा ब्लड रिपोर्ट आला नाही. सुरुवातीला आरोपीचं ब्लड सँपल घेण्यात आलं होतं. ते फॉरेन्सिकला दिलं आहे. आम्ही ड्यु डेलिजन्स घेण्याच्या दृष्टीकोणातून आणखी ब्लड सँपल घेतलं होतं. पहिलं आणि दुसरं रक्त सँपल सेम आहे की नाही हे पाहण्यास आम्ही फॉरेन्सिकला सांगितलं आहे. आरोपीने अल्कहोल घेतलं होतं की नाही याची माहिती घेण्यासाठी पहिलं ब्लड सँपल घेण्यात आलं.
रिपोर्ट काहीही येऊ द्या
पहिलं ब्लड सँपल घेण्यात आली होती. त्यातील अल्कोहलची विचारणा करण्यात आली होती. या प्रकरणात आणखी एक ब्लड सँपल घेण्यात यावी असं वाटलं, त्यात काही मॅनेज झालं तर खबरदारी म्हणून आम्ही हे सँपल घेतलं आहे. गुन्हा 8 वाजता घडला होता. ससूनमध्ये 11 वाजता त्याचं ब्लड सँपल घेतलं. त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 8 च्या दरम्यान दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दुसरं ब्लड सँपल घेतलं. डीएनए चाचणीसाठीचं हे सँपल घेतलं होतं. पण ब्लड रिपोर्ट काहीही येऊ द्या. ही केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाहीये. या केसची दिशाच वेगळी आहे, असं त्यांनी सांगितलं. ब्लड रिपोर्टबाबत अधिक टिप्पणी करणं योग्य नाही. पण आरोपीला गुन्ह्याची जाणीव होती. त्याला काही कळतंच नव्हतं असं नव्हतं. आपल्या कृत्यामुळे गुन्हा घडू शकतो हे त्याला पूर्णपणे ज्ञात होतं, असं त्यांनी सांगितलं.