मेंदू आणि दम्याचा आजार, त्या दिवशी सुरेंद्र अग्रवाल कुठे होते?; कोर्टातील युक्तिवाद काय?

सुरेंद्र अग्रवाल सकाळपासून रात्रीपर्यंत पोलीस चौकशीला सहकार्य करत आहेत. ते कुठे पळून जाणार नव्हते. आणखी काही करणार नव्हते. यातील फिर्यादी ड्रायव्हर हा आरोपीच्या घरी कधीच राहत नाही. तो दुसरीकडे राहतो आणि ये-जा करत असतो. त्या दिवशी तो स्वत:हून आरोपीच्या घरी आला आणि एक दिवस राहू देण्याची विनंती केली, अशी माहिती अग्रवाल यांच्या वकिलाने कोर्टाला दिली आहे.

मेंदू आणि दम्याचा आजार, त्या दिवशी सुरेंद्र अग्रवाल कुठे होते?; कोर्टातील युक्तिवाद काय?
surendra agarwalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 5:46 PM

पुण्यातील पोर्श कांड प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना सकाळी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांना 28 तारखेपर्यंतची कोठडी सुनावली आहे. यावेळी सुरेंद्र अग्रवाल यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत अग्रवाल यांच्या सुटकेची मागणी केली. अग्रवाल यांना मेंदूचा आजार असून त्यांना दमा असल्याचंही वकिलाने कोर्टापुढे सांगितलं. मात्र कोर्टाने दोन्ही वकिलांचं म्हणणं ऐकून अग्रवाल यांना 28 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.

सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केल्यानंतर दुपारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांच्या रिमांडवर सुनावणी सुरू झाली. कोर्टात सुनावणी सुरू होताच अपघात घडला त्यावेळी आपण पुण्यात नव्हतो. त्या दिवशी मी दिल्लीत होतो. तेव्हाच पोलीस सर्व व्हिडीआर घेऊन गेले आहेत, असं सुरेंद्र अग्रवाल यांनी कोर्टाला सांगितलं. यावेळी पोलिसांनीही कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. सीसीटीव्हीसोबत छेडछाड करण्यात आली. आरोपीची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे मोबाईल सापडला. त्याचा डेटा तपासायचा आहे. आरोपीवर कोंढवा, महाबळेश्वर आणि बंडगार्डन आदी ठिकाणी चार गुन्हे दाखल आहेत. आरोपीने ड्रायव्हरला घरात डांबून ठेवलं, गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला. त्यामुळेच आरोपीची जास्तीत जास्त कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची सात दिवसांची कोठडी मागितली होती.

डांबून ठेवलं नव्हतं

यावर आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. अपघाताच्या घटनेनंतर ड्रायव्हर स्वत:हून आरोपीच्या घरी गेला होता. माझ्या जीविताला धोका आहे, त्यामुळे एक दिवस इथेच थांबून नंतर घरी जातो म्हणाला होता. त्याला डांबून ठेवलं नव्हतं, असा दावा प्रशांत पाटील यांनी केला.

कुठेही जाणार नाही

यावेळी वकील प्रशांत पाटील यांनी अर्नेश कुमार केसचाही दाखला दिला. आरोपीचं वय 70 पेक्षा जास्त आहे. त्यांना विविध आजार आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना मेंदूशी संबंधित आजार आहे. त्यांना दम्याचाही त्रास आहे. त्यांना काही अडचण आली किंवा डॉक्टरची गरज भासली तर आवश्यकतेनुसार डॉक्टरांना बोलावलं जातं. त्यामुळे त्यांना कोठडी देऊ नये. त्यांना जामीन देऊन त्यांची सुटका करावी. तपासात ते पूर्ण सहकार्य करतील. कुठेही जाणार नाहीत, असं पाटील म्हणाले.

न्यायालयीन कोठडी द्या

महाबळेश्वर प्रकरणात अग्रवाल निर्दोष सुटलेले आहेत, याकडेही पाटील यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. अग्रवाल यांना पोलीस कोठडी देऊ नये. त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी. गरज वाटल्यास पोलीस तिथे जाऊन त्यांची चौकशी करू शकतात. कारण अग्रवाल पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना सहकार्य करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.