पुणे : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी बेबीच्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला होता. पाकिस्तानी हसीनाने त्याच्याकडून अनेक माहिती काढून घेतली. मे महिन्यात उघड झालेल्या या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने केला. विशेष तपास पथकाने दोन महिने चौकशी केली. त्यानंतर प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात भक्कम पुरावा जमा केला. आता पुणे जिल्हा न्यायालयात सुमारे दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्या आरोपपत्रात अनेक गोष्टींचा उल्लेख आहे.
पाकिस्तानी हसीनाला प्रदीप कुरुलकर ड्रीम गर्ल म्हणत होता. त्यासंदर्भात खुलासा चार्जशीटमध्ये केला आहे. पाकिस्तानी महिलेला तीन ई-मेलच्या माध्यमातून प्रदीप कुरुलकर याने माहिती दिली. dreamgirl56@gmail.com। या मेल आयडीचा पासवर्ड पाकिस्तानी गुप्तहेर झाला दासगुप्ता आणि प्रदीप कुरुलकर या दोघांकडे होता. त्याने तिच्याशी शारीरीक संबंध निर्माण करण्यासाठी ही माहिती दिली.
पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ता या नावाने प्रदीप कुरुलकर याच्याशी संपर्क करीत होती. आता या पाकिस्तानी गुप्तहेरने स्वतःचे नाव जुही अरोरा ठेवल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे. कुरुलकर याचे संबंध अनेक महिलांसोबत होते. तो डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना बोलवत होता. यासंदर्भातील जबाब दोन महिलांनीही दिला आहे.
पाकिस्तानी गुप्तहेराने आधी प्रदीप कुरुलकर याच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर HI… पाठवले अन् दुसरेच नाव लिहिले. मग प्रदीप कुरुलकर याने स्वत:चा परिचय देत उत्तर दिला. आपण डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ असल्याचे त्याने म्हटले. यानंतर पाकिस्तानी गुप्तहेरने आपले नाव झारा दासगुप्ता सांगितले आणि आपण भारतीय असून इंग्लंडमध्ये राहत असल्याचे सांगितले. मग त्यानंतर त्यांचे संभाषण सुरु झाले. ऑडिया कॉलनंतर व्हिडिओ कॉल सुरु झाले. त्यात ती न्यूडसुद्धा झाली.
प्रदीप कुरुलकर याच्याकडे दोन पासपोर्टही सापडले आहे. शासकीय पासपोर्ट वापरुन पाच ते सहा देशांचा दौरा केला आहे. त्यामुळे विदेशात तो कोणाला भेटला आणि त्याने काय माहिती दिली? हे ही तपास समोर आले आहे का? हे स्पष्ट झाले नाही.