कोयता गँगचा प्रसार आता शाळांपर्यंत!; पुण्यात नेमकं चाललंय काय?

अल्पवयीन तरुणाने या शाळकरी मुलावर हल्ला केला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोयता गँगचा प्रसार आता शाळांपर्यंत!; पुण्यात नेमकं चाललंय काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 6:06 PM

पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत (Terror) कमी होत नाहीय. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याने ही खरी चिंतेची बाब आहे. या गँगचा प्रसार आता थेट शाळांपर्यंत येऊन पोहोचला आहे. आज शहरात अशाच एका धक्कादायक घटनेने खळबळ माजली आहे. प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झाले. त्यात एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला (Attack on Student) करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आधी कोयता गँग होत्या. पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवळल्या. आता मुलं कोयत्याचा वापर गुन्हेगारीसाठी करताना दिसून आले. ही भीतीदायक घटना आहे.

पुण्यातील नूतन मराठी विद्यालय (नुमवी) या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर भर दिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. विद्यार्थ्याच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला आहे.

जखमी विद्यार्थी रुग्णालयात

अल्पवयीन तरुणाने या शाळकरी मुलावर हल्ला केला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याची चर्चा आहे.

स्टेट्स ठेवणाऱ्यावर कारवाई

यापूर्वी पुण्यात कोयता गँगवर कडक कारवाई सुरू होती. पिंपरी चिंचवडमध्ये ही पोलिसांनी कोयता बाळगणाऱ्यावर धडक कारवाई सुरू केली होती. हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत कोयता हातात घेवून स्टेटस ठेवणे दोघांना चांगलेच महागात पडले होते.

शाळेतच कोयता निघाल्याने दहशत

दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोघांनी हात जोडून आमची चूक झाल्याचा व्हिडिओ प्रसारित केलाय. -कोयता पकडून देणाऱ्या पोलीस स्थानकाला गुण दिला जाणार आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस स्थानकाची नोंद ठेवली जाणार आहे. हे सर्व असताना आता शाळेतचं कोयता निघाल्यानं कोयता गँगची दहशत पुन्हा निर्माण झाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.